गडचिरोली,दि. २१: जिल्ह्याच्या विकासात नक्षलीच अडसर निर्माण करीत असल्याची जाणीव दुर्गम भागातील आदिवासींना होऊ लागल्याने त्याचा विरोध करण्यासाठी आदिवासी स्वतःच पुढे येऊ लागले आहेत. त्याचाच प्रत्यय सिरोंचा तालुक्यातील तमंदला गावातील गावकऱ्यांनी नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळून केल्याचे चित्र आज बघावयास मिळाले. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचा संकल्प करीत लोकशाही विरोधी, नक्षल समर्थनाचे बॅनर गावकऱ्यांनी स्वतः काढून टाकून बॅनरची जाळपोळ करीत जिल्ह्यातील आदिवासी आता नक्षल्यांना भीक घालणार नसल्याचा संदेश एकप्रकारे नक्षल्यांना दिला आहे.
सिरोंचा तालुक्यातील अहेरी – सिरोंचा रस्त्यारील तमंदला गावाच्या फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला नक्षलवाद्यांकडून बॅनर लावण्यात आले होते. आज नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर जाळून टाकत तमंदला गाव व परिसरातील नागरीकांनी नक्षल चळवळीचा तीव्र निषेध केला.
No comments:
Post a Comment