पुणे,दि.18: राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी तर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची पंतप्रधान कार्यालयाच्या ‘स्मार्ट सिटी सेल’ मध्ये बदली होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी राव यांच्याकडे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गी लावण्याची जबाबदारी आहे. राव आणि कुणाल कुमार यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. परंतु, मुदत संपली असली तरी बदली करण्याचे सर्वाधिकार राज्यसरकारला आहेत.
फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. राव यांनी या पूर्वी सोलापूर आणि नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी काम केलेले आहे. ते गोंदियाच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही कार्यरत होते. तसेच वर्धा येथे त्यांनी महसूल खात्यात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
No comments:
Post a Comment