Saturday, 23 September 2017

कर्जमाफीसाठी 58 लाख अर्ज


मुंबई,दि.23 – कर्जमाफीसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत 58 लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज आल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात 89 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत, हा सरकारचा दावा खोटा ठरला आहे. यात किमान 15 ते 20 लाख खोटे खातेदार असल्याची शंका सहकार खात्याला आहे. आठवडाभरात हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे समजते.
राज्य सरकारच्या घोषणेनुसार राज्यात 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सरकारने जाहीर केले होते. या शेतकऱ्यांना सुमारे 34 हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, असेही सरकारने जाहीर केले आहे. मात्र, या थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांबद्दलची कोणतीच माहिती राज्य सरकार अथवा राज्याच्या सहकार विभागाकडे नाही. 2008-09 च्या कर्जमाफीत 70 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते. सहकार खात्याने आता याबाबत बॅंकांना विचारणा केली असता तेव्हाची माहिती उपलब्ध नसल्याचे बॅंकांनी सांगितले. काही हजारांच्या कर्जासाठी शेतकरी, नागरिकांना नोटिसावर नोटिसा बजावणाऱ्या बॅंकांकडे 10 हजार कोटींच्या कर्जमाफीचे कोणतेही पुरावे नसावेत, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...