Thursday 21 September 2017

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

मुंबई, दि. २१ : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याचा दर १३२ वरून १३६ इतका करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागाने आज दि. २१ सप्टेंबर रोजी निर्गमित केला आहे.
महागाई भत्त्याची रक्कम दि. १ ऑगस्ट २०१७ पासून रोखीने देण्यात येणार आहे तर १ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असेही या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे तशीच यापुढेही चालू राहील तसेच हे आदेश सुधारित वेतनसंरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१७०९२११४०१३६३३०५  असा आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...