Wednesday, 13 September 2017

सरकार शेतकºयांची फसवणूक करतेय-शिवणकर


12gndph01_20170911798

आमगाव,दि.13 : सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकर्यांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे. सरकार जनतेचे कामे करित नसेल तर अशा सरकारला धडा शिकविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी केले.
ग्राम बनगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग़्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, कृउबासचे माजी सभापती टिकाराम मेंढे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता रहांगडाले, माजी जि.प. सदस्य उषा हर्षे, महिला महासचिव संगीता दोनोडे, पं.स.सदस्य प्रमोद शिवणकर, सिंधू भूते, तिरथ येटरे, महासचिव लक्ष्मी येळे, निखील पशिने, सरपंच संगीता ब्राम्हणकर, सुधा शहारे, सुनीता रहांगडाले, संगीता भांडारकर, बाबूलाल दोनोडे, प्राचार्य कमलबापू बहेकार, रविंद्र मेश्राम, विनोद कुन्नमूवार, बेनीश्वर कटरे, सिताराम फुंडे, सुरेंद्र कोटांगले, मुक्तानंद पटले, कल्पना बावनथडे, पुष्पा चौधरी, विनोद बोरकर, जनार्धन शिंगाडे, संजय मुनेश्वर, रवी क्षीरसागर, टुंडीलाल कटरे, दिनदयाल चौरागडे, तुलेंद्र कटरे, रमन डेकाटे उपस्थित होते.
याप्रसंगी हर्षे यांनी, सत्ता परिवर्तन कराल तरच सामान्यांचे दिवस येतील. केवळ राष्टÑवादीचे कार्यकर्ते हे राष्ट्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाज कार्यात भाग घ्यावा असे आवाहन केले. चंद्रीकापुरे यांनी, महराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतकºयांचे खच्चीकरण केले जात आहे. पिक विमाच्या फक्त देखावा व कागांवा करण्यात आला. त्याचे फलस्वरुप शेतकºयांना मिळाले नाही आणि मिळणार देखील नाही. सरकार व रिलायंन्सने फसवेगिरी केली आहे. आॅफलाईन अर्ज आजही जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्याचे काय, सरकारने उत्तर दयावे असे मत व्यक्त केले.
यावेळी ग्राम पंचायत निवडणूक, बेरोजगाराचे प्रश्न, शेतकºयांचे प्रश्न, दुष्काळ, कृषीमालाला रास्त भाव मिळावा तसेच सरकार धोरणाविरोधात आंदोलनाची चर्चा करण्यात आली. तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार यांनी दुष्काळ घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला तो पारित करण्यात आला. संचालन महासचिव देवेंद्र मच्छिरके यांनी केले. आभार कमल बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी विजय रगडे, राजू फुंडे, मेघश्याम मेंढे, लक्ष्मण हत्तीमारे, भरत येटरे, राहूल रगडे, प्रकाश फुंडे, विजय भांडारकर, संजय रावत, पुरुषोत्तम चुटे, संतोष श्रीखंडे, प्रशांत गायधने आदिंनी सहकार्य केले.
भाजप-सेना कार्यकर्त्यांचा प्रवेश
या सभेत ग्राम करंजी येथील परसराम लांजेवार, जितेंद्र लांजेवार, संतोष लांजेवार, राजेश लांजेवार, राजाराम लांजेवार, शालीकराम लांजेवार सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेनेतून राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षाची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...