Friday 22 September 2017

आमगाव विधानसभा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त जाहीर करा


21gndph19_20170914270


देवरी,दि.22 : आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे धानाचे उत्पादन होऊ शकले नाही. या तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. या मागणीचे निवेदन आ. संजय पुराम यांनी कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांना मंगळवार (दि.१९) मंत्रालयात दिले. यावर कृषीमंत्र्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले.
या दरम्यान आ. पुराम यांनी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सालेकसा तालुक्यातील आदीवासींचे देवस्थान कचारगढ व हाजराफॉल (धबधबा) येथे रोपवे मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केलीे आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून दोन्ही ठिकाणी पर्यटक व भाविक लाखोंच्या संख्येत येतात. रोपवे निर्माण केल्यास येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. सदर ठिकाण महाराष्ट्राच्या महत्वाच्या पर्यटनाच्या नकाशावर घेता येतील. यासाठी आपल्या विभागाकडून सदर प्रकल्प मंजूर करुन ऐतिहासीक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.
यावर सुधीर मुनगंटीवार यांनी वनखात्याचे सचिव यांना तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनासुध्दा निवेदन देवून देवरी, सालेकसा, आमगाव तिन्ही तालुके तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. तसेच पर्यटन व रोजगार मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून एमटीडीसी मार्फत हाजराफॉल व कचारगड येथे विश्रामगृह निर्माण करण्याची मागणी केली. यावर मंत्री रावल यांनी ‘ब’ वर्गाचे पर्यटन स्थळ असलेले कचारगड तसेच हाजराफॉल येथे विश्रामगृह बांधून देण्याची हमी दिली.
यावेळीे आ.पुराम यांनी या भागातील विविध समस्या मार्गी परिसराच्या विकासाला गती देण्याची मागणी विविध विभागाच्या मंत्र्यांकडे केली. तसेच विविध मागण्याचे निवेदन त्यांना दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...