Thursday 21 September 2017

दारू विकत घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं

हैदराबाद, दि. 21 – दारू विकत घेणं आता सोपं काम राहिलेलं नाही. कारण आता दारू विकत घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. तेलंगणामध्ये उत्पादन शुल्क विभागाने पबमधून दारू विकत घेण्यासाठी आता ओळखपत्र सक्तीचे केले आहे.

adhar-and-alchohole_20170914137तसेच 21 वर्षांखालील मुलामुलींना पबमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. याशिवाय अनेक पबमध्ये ड्रग्स आणि नशेचे पदार्थ विकले जात असल्याचा संशय आहे, त्यामुळे 21 वर्षांखालील मुलामुलींना पबमध्ये प्रवेश नाकारावा आणि ग्राहकांचं वय सिद्ध करण्यासाठी ओळखपत्र मागावं तसंच एका रजिस्टरमध्ये ग्राहकाच्या डिटेलची नोंदणी केली जावी असे आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. केंद्र सरकार सर्व आवश्यक सेवांसाठी आधार कार्ड जोडणी सक्तीची करण्यामध्ये व्यस्त आहे. मोबाइल आणि पॅन कार्डला आधार कार्डसोबत जोडल्यानंतर सरकार ड्रायव्हिंग लायसन्सदेखील आधारसोबत जोडण्याची तयारी करत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...