नागपूर,दि.14-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी (दि.१४ सप्टेंबर) रोजी दिक्षाभूमिमार्गावरील आपल्या घरासमोरुन जाणारा सिमेंट रस्ता तडकल्याप्रकरणी महापालिका आयुक्त अश्विन मृदगल यांच्याकडे तक्रार नोंदविली.त्यांच्या या तक्रारीने परत नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपलाच घरच्या खासदाराने दिलेल्ला धक्का खळबळ माजविणारा ठरला आहे. ते त्यांच्या नातेवाईकांच्या एका खासगी कामासाठी महापालिकेत आले होते. परंतु, संधी बघता त्यांनी सिमेंट रस्त्यांच्या अनियमिततेबाबत आयुक्तांकडे तक्रार केली.
पटोलेंनी दीक्षाभूमी येथील त्यांच्या निवासस्थानापुढे तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे उदाहरण देत वर्षभरातच रस्त्याला तडी गेल्याचे सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे लाखोंच्या संख्येत अनुयायी शहरात दाखल होतात. दरम्यान, रस्त्याची स्थिती दयनीय आहे. लोकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच अपुरा आहे. परिणामी, नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, त्यांनी रस्त्यांची कामे घाईघाईत पूर्ण न करता ठेकेदारांना उत्तम क्वालिटीचे रस्ते तयार करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या. या मार्गाची दीक्षाभूमी येथील कार्यक्रमापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment