Monday, 18 September 2017

दिल्लीत ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्याला अटक

al-qaeda-terrorist_20170913389नवी दिल्ली, दि. 18 – देशाची राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदा या संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचे नाव शोमोन हक असे सांगण्यात येत आहे. या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ही कारवाई केली आहे. सेंट्रल दिल्लीतील विकास मार्गावरुन शोमोन हक याला काल रात्री (दि.17) अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षातील अल-कायदा या संघटनेच्या दहशतवाद्याला पकडण्याची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...