Thursday 14 September 2017

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

गडचिरोली, दि.14: भोजन करीत असताना कोरची येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना(दि.१२)संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुशील नेवलसिंग नैताम(१६)रा.बोगाटोला, ता.कोरची असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
काल रात्री सर्व विद्यार्थी भोजन करीत असताना सुशील नैताम यास विषारी सापाने दंश केला. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान,सुशीलच्या मृत्यूस आश्रमशाळा प्रशासन जबाबदार व आरोग्य विभाग जबाबदार असल्याने मुख्याध्यापक व अधीक्षकास निलंबित करावे, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयास ५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, आश्रमशाळेत भौतिक सुविधा तत्काळ पुरवाव्यात, आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावी, इत्यादी मागण्या मृत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय व नागरिकांनी केल्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली होती. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...