गडचिरोली,दि. १८: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी आज क्लेमोर माईन्सचा स्फोट करुन पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षल्यांचा डाव फसला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभिया गट्टा पोलिस मदत केंद्रातील पोलिस जवान आज नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना जांभिया नाल्याजवळ नक्षल्यांनी क्लेमोर माईन्सचा स्फोट घडवून पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्क होऊन नक्षल्यांना प्रत्युत्तर दिले. यामुळे पोलिस थोडक्यात बचावले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. नंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन क्लेमोर पाईप, बॅटरी, स्प्रींटर्स, वायर बंडल ताब्यात घेतले.
दुसऱ्या एका घटनेत एटापल्ली-हेडरी रस्त्यावर नक्षल्यांनी भूसुरुंग पेरुन ठेवला होता. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या साह्याने तो निकामी केला. त्या ठिकाणी ४ फूट खोल खड्डा पडला आहे.
No comments:
Post a Comment