Tuesday, 19 September 2017

राजुरा मुक्तीसंग्राम लढ्याच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी

17cpph26_20170913222चंद्रपूर,दि.19: हैदराबाद संस्थानावरील निजामांचे राज्य उलथवण्यासाठी व निजामाहीच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती देण्याकरिता हजारो नागरिकांनी राजुरा मुक्ती संग्रमाचा लढा निर्धाराने लढला. स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ , रवि नारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशपायम व अनेक सेनानीच्या नेतृत्वात लढलेल्या या लढ्यामुळे या संस्थानातील अनेक शहरे, गावे निजाम संस्थानातून मुक्त झाली. हे स्वातंत्र्य चिरायू होण्यासाठी विद्यमान पिढीने प्रेरणा घेत सर्वांनी बंधूभाव व ऐक्याची भावना बाळगून विकास समृध्द असा नवभारत घडविण्याचे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

राजुरा मुक्तीसंग्राम सोहळ्यानिमित्त जिवती येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी जिवती येथील बसस्थानक परिसरात केंद्रीय गृह राजयमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहन पार पडले. याप्रसंगी जिवती भाजप तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, भाजप उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री राजू घरोटे, भाजप महामंत्री सुरेश केंद्रे, पृथ्वीनाथ चव्हाण, उपाध्यक्ष दत्ता राठोड, जि.प. सदस्य कमलाबाई राठोड, राजेश राठोड, नगरपंचायत सदस्य अनुसयाबाई राठोड, सुंदरबाई राठोड, किरण चौहाण, जिवतीचे तहसिलदार, जि. प., पं. स. सदस्य व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...