Tuesday, 19 September 2017

येणारा काळ काँग्रेसचाच-आ.वड्डेटीवार


18bhph16_20170913486
भंडारा,दि.19 : केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सिलिंडर्सचे दर ३८२ रुपये करायला ४० वर्ष लागले, परंतु विद्यमान भाजपा सरकारने ४० महिन्यात ७८४ रुपये केले. आता केंद्रीयमंत्री कुठे गेले, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा येणारा काळ काँग्रेसचाच आहे, असा आशावाद विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे होते. याप्रसंगी भंडारा विधानसभा प्रभारी मुजिबभाई पठाण, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, मधुकर लिचडे, बशीर पटेल, विकास राऊत, सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम, डॉ. अजय तुमसरे, धनराज साठवणे, प्रशांत देशकर, दीपक गजभिये, आशिष पात्रे, प्यारेलाल वाघमारे, रमेश डोंगरे, प्रदीप बुरडे, नीलकंठ कायते, के.के. पंचबुद्धे, प्रेम वणवे, अर्चना वैद्य, मंगला बगमारे, स्वाती लिमजे, सुनील गिºहेपुंजे, कमलाकर रायपूरकर, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, भूषण टेंर्भूणे, मुकुंद साखरकर, विष्णू रणदिवे, सचिन फाले, नीरज गौर, सचिन घनमारे, राजकपूर राऊत, मनोहरराव उरकूडकर, माणिकराव ब्राह्मणकर, अश्विन नशिने, भूमेश्वर महावाडे, शंकर राऊत, प्रभुजी मोहतुरे, धनराज मोटघरे,मंगेश हुमणे, निलेश सावरबांधे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केले. येणाºया काळात पक्ष बळकटीकरिता सर्व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. त्यांनी यावेळी काही प्रस्ताव सादर केले. यात पहिला प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी. कुठलीही जाचक अट लादू नये.
शेवटच्या शेतकºयांना मदत मिळालीच पाहिजे. परंतु या सरकारची कर्जमाफी करायची नियत नाही असे आवर्जून सांगितले. दुसरा प्रस्ताव, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने भंडारा जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती उत्पन्न झाली त्यामुळे भंडारा जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करावा. तिसरा प्रस्तावात त्यांनी भारनियमन रद्द करून २४ तास वीज पुरवठा करावा जेणेकरून शेतकºयांना त्याचा लाभ मिळेल अन्यथा पीक करपल्याशिवाय राहणार नाहीत. चौथा आणि अंतिम प्रस्तावात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, व रॉकेलचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारचा निषेधात्मक प्रस्ताव ठेवण्यात आला. त्वरित यांचे भाव कमी करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रस्तावातून देण्यात आला. या सर्व प्रस्तावांचे एकमताने अनुमोदन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लाखांदूर तालुका अध्यक्ष भूमेश्वर महावाडे, तुमसर तालुका अध्यक्ष शंकर राऊत तसेच धनराज मोटघरे यांचा सत्कार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभार प्रदर्शन प्यारेलाल वाघमारे यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...