Sunday 17 September 2017

भाजपाच्या काळात आदिवासींनी विकास साधावा

16whph25_20170913041वर्धा,दि.17 : भाजपाची अठरा राज्यासह देशावर सत्ता आहे. त्यामुळे आदिवासींना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज नाही. भाजप सरकारच्या काळात आदिवासींनी आपला विकास करून घेतला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
येथे आयोजित भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महाराष्टÑ प्रदेश आदिवासी मोर्चा आघाडीचे प्रा. हरिशचंद्र भोये, भाजपच्या आदिवासी विकास आघाडीचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. अशोक नेते, महाराष्टÑ प्रभारी अमसिंग तिलावत, लक्ष्मीकांत घानगावे, खा. रामदास तडस, उध्दव येरमे, कृष्णराव चव्हाण, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. पास्कल धनारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. राजु तोडसाम, श्याम धुर्वे, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी आदींची उपस्थिती होती.
अमरसिंग तिलावत यांनी महाराष्टÑात २६ आदिवासी लोकसंख्या बहुल असलेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यात आदिवासींच्या अनेक अडचणी आहेत. सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवाव्यात. वेळप्रसंगी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दरबारीही याबाबत बैठक घ्यावी, अशा सुचना दिल्या.बैठकीला महाराष्टÑातील २६ पैकी आदिवासी आघाडीचे १४ जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. राज्यातील आदिवासी आघाडीच्या संघटन बांधनीची माहिती या बैठकीत घेण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तथा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...