गोंदिया,दि.13 – दक्षिण-पूर्वमध्य रेल्वे अंतर्गत १ ते १० सप्टेंबरपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट, अनियमित प्रवास व माल बुक न करता लगेज वाहून नेणे तसेच केरकचरा पसरविण्याचे प्रकरणे नोंद करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून एकूण ७ लाख ४८ हजार २३० रूपयांचे दंड वसूल करण्यात आले. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातङ्र्के मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाèयांच्या पुढाकारात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलांचा कर्मचाèयांच्या सहकार्याने नियमितपणे विविध अभियान राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत १ ते १० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानात विनातिकीट, अनियमित प्रवास तसेच माल बुक न करताच लगेजचे एकूण २ हजार ९५७ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून ७ लाख ४८ हजार २३० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय केरकचरा पसरविल्याप्रकरणी एकूण ४२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४०५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.या विशेष तिकिट तपासाअंतर्गत बालाघाटमध्ये किले बंदी तपासादरम्यान सहा. वाणिज्य प्रबंधक ओ.पी.जाइसवाल यांच्या नेतृत्वात १ सप्टेंबर ला विनातिकिट, अनियमित प्रवास व माल बुक न करता लगेज वाहून नेण्याच्या ५९६ प्रकरण दाखल करून एकूण १ लाख ८९ हजार ९१० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment