Thursday 21 September 2017

गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेला मोठे भगदाड


7255_Bhagdad
कुरखेडा,दि.21: पितृपंधरवड्याचे निमित्त साधून  कोरची व देसाईगंज येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह खा.अशोक नेते यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये कोरचीचे नगराध्यक्ष व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर व शिवसेनेचे देसाईगंज शहराध्यक्ष सचिन वानखेडे यांचा समावेश आहे.

भाजपाने कोरची येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खा.अशोक नेते, आ.क्रिष्णा गजबे, भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरचीचे नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी व शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, तसेच तालुक्यातील विविध गावचे ४ सरपंच व २ उपसरपंचानीही धनुष्यबाण सोडून कमळाचे देठ पकडले. नसरुद्दीन भामानी हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे ५ नगरसेवक निवडून आले होते. त्यांनीही शिवसेनेला रामराम ठोकला. यात नगरसेवक अरुण नायक, ज्योती नैताम, निराशा गावतुरे, खेमीनबाई केवास, अशवंती सोनार व स्वीकृत नगरसेवक घनश्याम अग्रवाल यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...