Saturday, 16 September 2017

लष्करी जवाना मारहाण- महिलेला अटक

नवी दिल्ली,16 : लष्कराच्या जवानाला भर रस्त्यात थोबाडीत मारणाऱया आणि शिविगाळ करणाऱया दिल्लीच्या 44 वर्षे वयाच्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संबंधित महिला रस्त्यात जवानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांत इंटरनेटवर व्हायरल झाला होता. सीमेवर लढणाऱया जवानांप्रती विलक्षण असंवेदनशील वागणाऱया या महिलेबद्दल व्हिडिओ पाहून लाखो लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
स्मृती कार्ला असे या महिलेचे नाव आहे. महानगर न्यायदंडाधिकाऱयांनी तिची जामिनावर सुटका केली आहे. नऊ सप्टेंबरला दक्षिण दिल्लीत वसंत कुंज परिसरात घडलेल्या या घटनेची तक्रार 13 सप्टेंबरला दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध करून महिलेला अटक केली. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...