Wednesday 13 September 2017

गोंदिया शहरात कोट्यवधींच्या काळापैशावरून भीतीचे वातावरण



सावकारांची दादागिरीः कधीही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

गोंदिया,१२- व्यापारी नगरी म्हणून पूर्व विदर्भात ओळख असलेल्या गोंदिया शहरात सद्यःस्थितीत काळ्या पैशाच्या वसुलीची चर्चा जोरात सुरू आहे. व्यापाऱ्यांना व्याजावर दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशाच्या वसुलीसाठी व्यापाऱ्यांना धमकावणे सुरू असून यामध्ये काही पोलिस कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याची खमंग चर्चा शहरात आहे. ही परिस्थिती पुढे स्फोटक होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत असून सरकार व प्रशासन हे प्रकरण कसे हाताळते, याकडे गोंदियाकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,नोटाबंदीमुळे हा पैसा त्या दबंग सावकारांनी गुंडगिरीच्या माध्यमातून वसूल करण्याचा मार्ग पत्करल्याचे नागरिक बोलत आहेत.
गोंदिया शहराची व्यापारासंदर्भात राज्यात चांगली ओळख आहे. या शहरात 'ब्लॅकमनी सर्क्यूलेशन'चा धंदा फारपूर्वी पासून जोरात सुरू आहे. याकडे प्रशासन व प्राप्तिकर विभाग नेहमीच डोळेझाक करीत आला आहे. हा काळापैसा एका विशिष्ट समाजातील काही गब्बर गरजू व्यापारी व आपल्याच समाजातील काही गरजवंतांना विशिष्ट व्याज आकारून देत असतात. त्याचे हप्ते कर्ज घेणारे व्यापारी हे टप्प्या टप्प्याटप्याने सावकारांना परत करीत असतात. तर हप्ते नियमित न देणाऱ्या कर्जदारांकडून 'मसलपॉवर'चा वापर करून सुद्धा कर्जाची वसुली सक्तीने केली जात असल्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. हा व्यवहार कोट्यवधींच्या घरात असून यातून गुन्हेगारी विश्वात सुद्धा वाढ झाली आहे.

या प्रकारामुळे कर्जदार व त्यांचे कुटुंबीय चांगलेच दहशतीत वावरत आहेत. या प्रकाराला घाबरून अनेक व्यापाऱ्यांंनी गोंदिया शहरातून पलायन केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. या अवैध काळ्यापैशाच्या वसुलीसाठी सावकार काही पोलिस कर्मचाèयांचा सुद्धा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे. कर्जाच्या वसूलीपोटी कर्जदाराचे घर रिकामे करणे, त्यांच्या भूखंडाचा ताबा घेणे, कर्जदारांच्या घरी वा दुकानात जाऊन मोठ्याने ओरडून त्यांची बेआब्रू करणे इत्यादी प्रकार सर्रास सुरू आहेत. हा सर्व व्यवहार कोणतेही लेखी करार न करता गेल्या कित्येक वर्षापासून शहरात सर्रास सुरू आहे. या प्रकारातून अनेक मोठे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आजवर मलई खात आले आहेत. सरकारने या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर शहरात मोठे अनुचित प्रकार कधीही घडू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...