Wednesday, 13 September 2017

तहसीलदार धक्काबुकीप्रकरणी बिलोली तहसील कार्यालयात लेखणी बंद आंदोलन

20170913_170326

नांदेड /बिलोली,दि.13 : बिलोली येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विद्याचरण कडवकर  यांना धक्काबुकी करून अपमानास्पद वागणूक देणारे अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे  परभणी यांना   तसेच गंगाखेड  येथील तलाठी शिवाजी मुरकुटे यांना मारहाण करणारे पोलीस निरीक्षक सोपान  शिरसाट यांना  निलंबित करून शिस्तभंग विषयक कारवाई करण्याच्या  मागणीसाठी आज १३ सप्टेंबर रोजी बिलोली  तहसील येथे लेखणी बंद  आंदोलन करण्यात आले.यावेळी बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार आर .जे चव्हाण ,अव्वल कारकुन सी.जी बेजगमवार , अव्वल कारकुन शेख हाजी ,  अव्वल कारकून  कलुरे ,लिपिक एल.बी हजारे,लिपिक हुंडे लिपिक रोेडे , लिपिक देवकते लिपिक गायकवाड, लिपिक गुंडे ,शिपाई नाहिदा बेगम नाईकवाडे ,शंकर कदम आदीसह  महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...