Monday, 18 September 2017

प्राचार्या रझिया बैग आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

देवरी: 18 (सुजित टेटे) शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग राज्य शासनाद्वारा देण्यात येणारा राज्य आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार गोंदिया जिल्हातील देवरी तालुक्यातील रझिया बैग यांना मिळालेला आहे. रझिया बैग ह्या देवरी येथील के एस जैन कन्या विद्यालयात प्राचार्या पदावर कार्यरत आहेत.आज सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. या सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य सुनील चौहान राज्य मंत्री विजय देशमुख प्रामुख्याने उपास्थित होते.
प्राचार्या रझिया बैग यांच्या कार्यप्रणालीचा आणि मिळालेल्या आदर्श शिक्षिका पुरस्काराचा सर्व क्षेत्रा कडून  शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...