Wednesday, 20 September 2017

मालेगाव स्फोटातील दोघांना जामीन

मुंबई,20-  २००८ च्या मालेगाव स्फोटातील दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने पाच वर्षांचा सर्शत जामीन मंजूर केला आहे. तब्बल नऊ वर्षानंतर सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी यांना न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.

मालेगाव स्फोटात अटक करण्यात आलेल्या संशयित साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना जामीन मिळाल्यानंतर, गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचीही जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर चतुर्वेदी आणि द्विवेदी यांनी ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयात हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न न करणे, पासपोर्ट जमा करून देश सोडून बाहेर न जाणे या अटींसह दोघांना पाच लाखांच्या जात-मुचलक्यावर न्या. एस. डी. टेकाळे यांनी जामीन मंजूर केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...