Thursday, 14 September 2017

जिवतीच्या बीडीओंला लाच घेताना अटक

चंद्रपूर,दि.14 : जिल्ह्यातील पंचायत समिती जिवतीचे गट विकास अधिकारी प्रकाश मांडवे यांना 13,250 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले आहे.दलित वस्ती योजनेतील नालीबांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडून 5 टक्के कमीशनची मागणी केली होती.विशेष म्हणजे या आधी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे सुद्दा मांडवे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले होते.यावेळी ग्रामसेवकांने एसीबीकडे तक्रार नोंदविल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...