Sunday 31 March 2019

पत्नीला कुऱ्हाळीने गंभीर जखमी करून इसमाची आत्महत्या

ओवारा /देवरी 31
तालुक्यातील ओवारा गावात आज पहाटे 5 च्या सुमारास घनश्याम राऊत 45 या इसमाने आपल्या पत्नीला कुऱ्हाळी ने गंभीर जखमी करून स्वतःला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सदर महिलेचे नाव सुनीता सांगण्यात येत आहे तिला गंभीर अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे हलविण्यात आलेले आहे.

Saturday 30 March 2019

प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश

मुंबई,दि.30(विशेष प्रतिनिधी): कसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी राहिलेले प्रविण गायकवाड यांनी काँग्रेस आज पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला रावेरची जागा सोडण्यात आली होती. त्याठिकाणी पक्षाचा उमेदवार म्हणून उल्हास पाटील यांची घोषणा केली . मात्र , पुण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून तो संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असे म्हणत या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवला.  गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु आहे. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून देखील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. काल तर लोककलावंत सुरेखा पुणेकरांचे नावही देखील चर्चेत आले होते. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि पुण्यात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा पुढे आले . लोकसभेच्या उमेदवारीचा मनसुबा ठेवत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, लोकसभेचे तिकीट हे माझ्यादृष्टीने महत्वाचे विषय नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील माझ्या पाठीराख्यांना वाटते की, आपल्या माणसाला तिकीट मिळालाय हवे. ते मिळाले तर त्याचा फायदा राज्यभरात होईल. नेतेमंडळी काही कारणांमुळे बाहेर असल्याने पक्ष प्रवेशाची प्रक्रिया लांबली होती.

देवरीतिल दोन टॉवरवर जप्तीची कारवाई


देवरी,दि.30 : नगरपंचायतकडून मागील थकबाकी व चालू वर्षाचे सर्व प्रकारचे करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेतंर्गत देवरी येथील रिलायन्स कम्युनिकेशन प्रा. लि. व रिलायन्स जियो इन्फोकॉम प्रा. लि. सेंटर या दोन्ही टावर्सवर धंदा कर वसुलीकरिता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
येथील नगर पंचायत प्रशासनाकडून शहरातील व्यवसायिक, व्यापारी, नागरिक, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय, मोबाईल टॉवर धारकांकडून मालमत्ता कर, व्यवसाय कर, पाणी कर आदी वसूल करण्यात येत असून यासाठी नगर पंचायतीकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार रिलायन्स कम्युनिकेशन प्रा. लि. कडे मागील सन २0१७-१८ या वित्तीय वर्षाचे ४0 हजार ३१0 तर यंदाच्या आर्थिक वर्षाचे ३६ हजार असे एकूण ७६ हजार ३१0 रुपयाचे थकीत व चालू वर्षाचे कर तर रिलायन्स जियो इन्फोकॉम प्रा. लि. सेंटर यांच्याकडे ३६ हजार रुपये व्यवसाय कर न भरल्याने या दोन्ही कंपनींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी विरेंद्र आचले, पाणी पुरवठा अभियंता सचिन मेश्राम, सहाय्यक लिपीक वामन फुन्ने व रोजगार सेवक यावलकर यांनी केली. नगर पंचायत प्रशसानाकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईने करचुकव्यांचे धाबे दणाणले आहे.

बुधवारला मोदींची गोंदियात होणार अंदाजे 5 कोटी खर्चाची सभा?

गोंदिया,दि.29ःः येत्या 3 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचाराकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाहिर सभा घेणार आहेत.
त्या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.बालाघाट-गोंदिया रिंगरोड मार्गावरील 16 एकर जागेत तयारी सुरु असून 2 लाख लोक उपस्थित राहणार असा अंदाज वर्तविला जात आहे.त्यासाठी आजपासूनच सभास्थळावर पोलीसांचा चोख बंदोबस्त सुरु करण्यात आला आहे.नागरिकांच्या बसण्यासाठी सुमारे दीड लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार असून चार ते पाच टॅ्क्टर,जेसीबी रोलरसह मैदानाचे सपाटीकरण सुरु करण्यात आले आहे.या सभेच्या प्रसिध्दीपासून ते नागरिकांना सभास्थळी आणणे व सोडून देण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्चाचे बजेट तयार करण्यात आल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.त्यामुळे या सभेतील खर्चाकडे निवडणुक अधिकारी किती इमानेइतबारे लक्ष देतात की सरकारी यंत्रणा म्हणून दुर्लक्ष करतात अशा चर्चांनाही उधाण आले आहे.या प्रचारसभेत भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासोबतच शेजारील मध्यप्रदेशातील बालाघाट लोकसभा मतदारसंघातील मतदारांनाही आणण्यात येणार आहे.माेदीची विदर्भातील ही दुसरी सभा राहणार आहे.त्यापुर्वी ते 1 एप्रिल रोजी वर्धा येथील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असल्याचे वृत्त आहे.सकाळपासून काही भाजपचे पदाधिकारी या सभास्थळावर ठाण मांडून मैदानातील व्यवस्थेकडे लक्ष देत आहेत.विशेष म्हणजे या सभेच्या नियोजनाची सर्व जबाबदारी नागपूरातील एका आमदाराकडे व स्थानिक विधानसभेतील संभाव्य उमेदवाराकडे दिल्याचेही वृत्त आहे.

पाच वर्षांच्या कालावधीत सरकारने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता नाही-खा.पटेल

तिरोडा,दि.30 : भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट लोकांच्या अपेक्षांचा भंग केला असून महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली आहे. मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. मात्र आपण या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तिरोडा तालुक्यात आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे व माजी आ.दिलीप बन्सोड, पंचम बिसेन, विजय शिवणकर, योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, कैलाश पटले, अर्जुन नागपुरे, घनश्याम मस्करे, कृष्णकुमार जायस्वाल, विमल नागपुरे, तुलीसराम बघेले, रिना रोकडे, निता पटले, रिना बघेले उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, आई-वडील काबाळ कष्ट करुन मुलांना शिकवून अधिकारी बनविण्याचा प्रयत्न करतात. मात्र देशाचा चौकीदार सुशिक्षित तरुणांना चौकीदार बनण्याचे निमंत्रण देऊन लाखो आई-वडीलांच्या स्वप्न आणि अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम करीत असल्याची टिका केली.
भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता न करता उलट बेरोजगारांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचा सल्ला दिला. तर जीएसटी लागू करुन व्यापार डबघाईस आणला व पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून सर्व सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. त्यामुळे आता मतदारांनाच योग्य काय आहे ते ठरवून आपला लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे. नाना पंचबुध्दे हे माजी राज्यमंत्री राहिले असून यापुढे सुध्दा त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. त्यामुळे ११ एप्रिलला मतदान करताना खोट्या आश्वासनला बळी पडून मतदान करु नकातर सजगपणे मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता – नाना पटोले

नागपूर,दि.30 : ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केली. याची तक्रार मुख्य व राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
ईव्हीएमवर सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोग मात्र ते सुरक्षित असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे ईव्हीएमची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी आयोगाची आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे लोकसभा निवडणुकीसाठी आलेल्या ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. विधानसभानिहाय स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. यावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे आयोगाचे आदेश आहे. मात्र, मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमसमोरील सीसीटीव्ही बंद असल्याचा दावा पटोले यांनी केला. त्याचा व्हिडिओसुद्धा त्यांनी पत्रकारांना दाखविला. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अतुल लोंढे, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.

चौकशी करू : मुद्‌गल

सीसीटीव्ही बंदसंदर्भात कॉंग्रेसची तक्रार मिळाली. सीसीटीव्ही कॅमेरे बंद नव्हते. तांत्रिक कारणामुळे स्क्रीनवर दोन कॅमेऱ्यांचे डिस्प्ले बंद होते. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतात. वीज गेली तरी बॅंकअपची व्यवस्था आहे. त्यामुळे ते बंद राहूच शकत नाही. सीसीटीव्हीचे सर्व फुटेज मागविण्यात आले आहेत. हा सर्व रेकॉर्ड त्यांना दाखविण्यात येईल. त्यांच्या तक्रारीची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. दोन अधिकाऱ्यांकडून खुलासाही मागविण्यात आला आहे. स्क्रीन बंद असल्याचे व्हिडिओ कुणी काढला, त्याचे इंटेशन काय होते, याचीही तपासणी करण्यात येईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी सी स्क्रीन बंद असल्याची तक्रार सी व्हिजिलच्या माध्यमातून आली असल्याचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी सांगितले.दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमधील सीसीटीव्ही बंद असल्याचा व्हीडिओ कुणी काढला याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिल्यानंतर शुक्रवारी अज्ञात व्यक्तीविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.

मनोहरभाई पटेल महाविद्यालायाला नॅक समितीची भेट



देवरी, दि. 30- स्थानिक मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य आमि विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या चमूने  गेल्या 27 व 28 तारखेला भेट दिली.
या त्रिसदस्यीय समितीमध्ये अध्यक्ष जयपूरच्या जगन्नाथ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एम एम गोयल, समन्यवयक  हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठीच्या वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉ. निर्मला राव आणि सदस्य म्हणून जामनगरच्या ए.के. दोषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हसमुख पडिया यांचा समावेश होता. या समितीने 27 व 28 तारखांना महाविद्यालयांचे मूल्यांकन केले.
या समितीचे स्वागत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरूण झिंगरे यांनी केले. यावेळी नॅक समन्वयक डॉ. अभिनंदन पाखमोडे यांचे सह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..     
    

Friday 29 March 2019

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं लावारीस - भाजप प्रवक्ते अवधूत वाघ

मुंबई,दि..29: भाजपच्या काही वादग्रस्त नेत्यांची बेताल वक्तव्य करण्याची खोड काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. वादग्रस्त विधानांच्या मालिकेत आता भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचे सुद्धा नाव जोडले गेले आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना 'लावारीस' लावारिस संबोधून अख्या देशाच्या पोशिंद्याची इभ्रत रस्त्यावर मांडली आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांचा तोल सुटला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे त्यांचेसह भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ ट्विटरवर 'चौकीदार अवधूत वाघ' या अकाऊंटवरुन सक्रिय आहेत. याच अकाऊंटवरुन त्यांनी एक ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना हिनवले आहे. मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी पातळी सोडली. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला 'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा...', असं उत्तर वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 
याआधी भाजपच्या विद्वान नेत्यांनी बरीच वादग्रस्त विधाने केल्याची उदाहरणे समोर आली होतीय
 

Thursday 28 March 2019

गेवराई येथे जुनी पेंशन हक्क संघटनेची सहविचार सभा

बीड,दि.28- महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना शाखा गेवराईची शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत कार्यालयीन प्रमुखांसह काल दि.27 (बुधवार) गेेवराई येथे  सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत गेवराई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक याचेसह महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन चे राज्य सहकोषाध्यक्ष कैलास आरबड,जिल्हाध्यक्ष विष्णू आडे, जिल्हाप्रसिद्धिप्रमुख नितीन फसले, तालुकाध्यक्ष जितेंद्र दहिफळे,सचिव रमेश पवार,कार्याध्यक्ष सचिन दाभाडे,उपाध्यक्षा भरत काकडे,उपाध्यक्ष बाळासाहेब चिकणे,संपर्कप्रमुख अनिल मेंढके,संपर्कप्रमुख अशोक भोजगुडे,प्रवक्ते अविनाश ढेरे,सौदागर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 या सभेत खालील विषयावर सवित्र चर्चा करण्याच आली.
1 वेतनश्रेणी निश्चिती संदर्भात त्रुटी दूर करणे
2 चटोपाध्याय प्रस्ताव आढावा
3 स्थायित्व प्रस्ताव आढावा
4 मराठी हिंदी सूट मिळणे बाबत आढावा
5 बीड वरून पगाराचे पत्र आल्यास दुसऱ्याच दिवशी पगाराचे चेक देने
6 वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाल्याचा दिवसापासून वेतन निश्चित करण्यात यावे
7 अर्जित रजा कालावधीचा पगार नियमित काढण्यात यावा
या सभेत जिल्हाध्यक्ष विष्णू आडे यांनी उपरोक्त विषयावर  उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करीत समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. यावेळी बोलताना उपस्थित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर उपाय योजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
 सभेच्या आयोजनासाठी  आबासाहेब राठोड,उमेश लगड,रवी ओव्हाळ, कृष्णा पवार,किशोर उदमले, आशिष फुलझळके, हरिभाऊ घोडके,बाळासाहेब वनवे,ज्ञानेश्वर मस्के,प्रदीप ठोंबरे, पोपट फरांडे,सतीश वारे,भारत शिंदे,कोरे,जीवन जोगदंड,सचिन हुलजुते,आदिनाथ भारती, यादव,अमर भुतडा,विलास दुधाळ,मार्गदर्शक दिलीप नरुटे सर,कें मु अ खेडकर सर,मु अ तुरे सर,कैलास चव्हाण, अमोल गायकवाड,मनोज पैठणकर,संतोष थोटे, भागवत धर्मे,कोरे सर रोहितळ,जगदीश ढाकणे,अरुण बनसोडे ,जे एन जाधव,धर्मराज करपे,पुरोषात्तम पराड, दत्तात्रय वारे,उमेश ढेपे,सुनील राठोड,गोवर्धन गर्कल,पांडुरंग गर्कल,कुणाल सोनाग्रा,विलास पवार,तारळकर,आदींनी सहकार्य केले.  सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष जितेंद्र दहिफळे यांनी तर उपस्थितांचे आभार संपर्कप्रमुख अनिल मेंडके यांनी मानले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक : सोशल मिडियावर गोंदिया सायबर सेलची करडी नजर

आचारसंहिता भंग करणाऱ्याच्या विरोधात होणार कारवाई
गोंदिया दि. 27 : : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ११ एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. निवडणूकीची घोषणा झाली त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार आणि त्या पक्षांचे स्टार प्रचारक यांच्या वतीने किंवा त्यांना फायदेशीर होईल अशा बातम्या वृत्तपत्रांमधून, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून, केबल चॅनल्स, मोबाईल नेटवर्क किंवा सोशल मिडिया यावर देतांना उमेदवाराने त्याची माहिती रोजच्या रोज निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रचारासाठी कोणी अशाप्रकारच्या बातम्या प्रकाशित किंवा प्रसारीत केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता लोकप्रतिनिधी कायदा इत्यादी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सोशल मिडियावर मतदारास प्रलोभने/लाच देणे, समाजामध्ये जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट प्रसारीत करणे, पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कामाशी संबंधित नसलेल्या खाजगी बाबींवर टिका करणे, मत मिळविण्याकरीता जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करणे याप्रकारचे कोणतेही व्हिडिओ/फोटो लाईक करणे, फॉरवर्ड करणे अर्थात ते पुढे पाठविणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, आपल्या स्टेटसला ठेवणे या कृती कायदयाचा भंग करणाऱ्या आहे.
पोलीस अधीक्षक विनीता एस.यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिसांचा सायबर सेल आता व्हॉटस्ॲप ग्रुप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम व हाईक यावर सोशल मिडिया तसेच वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडिया, केबल चॅनल्स, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क यावर करडी नजर ठेवणार असून त्याबाबत संबंधितांवर प्रचलित कायदयाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगातर्फे लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारीत करु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे पोलीस अधीक्षक विनीता एस. यांनी कळविले आहे.

Wednesday 27 March 2019

पटवारी ने ली दूसरे के माध्यम से रिश्वत

गोंदिया-गोंदिया तहसील अंतर्गत पटवारी कार्यालय कामठा में कार्यरत पटवारी वंदना बुधराम डोंगरे ने अपने एक निजी व्यक्ति के माध्यम से ८०० रुपए की रिश्वत ली। गोंदिया एन्टी करप्शन की टीम ने रिश्वत स्वीकारते हुए रंगेहाथ गिरफ्तार कर लिया है। घटना २६ मार्च को देर शाम को सामने आई है। 
इस मामले में रावणवाड़ी पुलिस थाने में पटवारी वंदना डोंगरे व गणेश महादु कोरे के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस संदर्भ में जानकारी दी गई कि शिकायतकर्ता महिला ने बेटे व अपने नाम जमीन का फेरफार करने के लिए पटवारी कार्यालय में २३ मार्च को आवेदन किया था। फेरफार करने के नाम पर एक हजार रुपए की मांग पटवारी डोंगरे ने की थी। लेकिन रुपए देने की मंशा न होने से २५ मार्च को महिला ने इस मामले की शिकायत गोंदिया एसीबी से की। शिकायत के आधार पर एसीबी की टीम ने जांच पड़ताल की। जिसमें २६ मार्च को पटवारी वंदना डोंगरे ने अपने पद का दुरुपयोग कर ८०० रुपए रिश्वत मांगी और एक निजी व्यक्ति गणेश कोरे के माध्यम से रिश्वत ली। रिश्वत लेते गोंदिया एसीबी की टीम ने पंचों के समक्ष पकड़ लिया। इस मामले की शिकायत रावणवाड़ी पुलिस थाने में की गई। शिकायत के आधार पर पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ धारा ७, १२, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ के तहत मामला दर्ज किया है। उपरोक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पुलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार के मार्गदर्शन में पुलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पुलिस हवलदार प्रदीप तुड़सकर, राजेश शेंद्रे, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, देवानंद मारबते आदि ने की है।

३७३ पोलिसांना खडतर सेवेचे पदक




गोंदिया,दि.२७: नक्षलग्रस्त भागात २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्यामार्फत कठीण आणि खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक दिले जाते. त्यानुसार, १६ मार्चला जिल्ह्यातील ६२ अधिकारी व ३११ कर्मचारी अशा एकूण ३७३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे.
राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या विशेष सेवा पदकाचे मानकरी यंदा गोंदिया जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक व ४७ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तसेच ३११ कर्मचाऱ्यांची या विशेष सेवा पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यात गोंदियाचे उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, आमगावचे राजीव नवले, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गोंदिया पोलीस उपअधीक्षक गृह दीपाली खन्ना तर पोलीस निरीक्षकांमध्ये गोंदिया ग्रामीणचे सुरेश नारनवरे, मोटार परीक्षण विभागाचे राजेश लबडे, नक्षल सेलचे सुनील उईके, सालेकसाचे ठाणेदार मोहन खंदारे, देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे, जिल्हा विशेष शाखेचे अशोक तिवारी, नक्षल आॅपरेशन सेल देवरीचे मंगेश चव्हाण, रामनगरचे ठाणेदार संजय देशमुख, रावणवाडीचे ठाणेदार सचिन सांडभोर, केशोरीचे मनिष बंसोड, तिरोड्याचे संदीप कोळी यांचा समावेश आहे. उपनिरीक्षकांमध्ये गोरेगावचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, सशस्त्र दूरपरिक्षेत्र धाबेपवनीचे नितीन कोळी, नवेगावबांधचे हनुमंत कवले, नक्षलसेलच्या राधीका कोकाटे, श्वान पथक गोंदियाचे यादव तमरेटी, रामकृष्ण सरवर, रावणवाडीचे लक्ष्मण कीर्तने, डुग्गीपारचे भगवान झरेकर, रामनगरचे योगेश शेलार, रावणवाडीचे सचिन साळवे, गोंदिया शहर येथील सागर पडवळ,डुग्गीपारचे सचिन पांढरे, दवनीवाडाचे अतुल कदम, गंगाझरीचे रोहीदास पवार, गोरेगावचे अजित पाटील, सालेकसाचे किशोर घोडेस्वार, गोंदिया शहर येथील सागर अरगडे, मारोती दासरे, चिचगडचे राजेंद्र यादव, रामनगरचे तुषार काळेल, रावणवाडीचे उद्धव हाके, गोंदिया ग्रामीणचे सुशिल लोंढे, तिरोडा येथील विरेंद्रसिंग बायस, देवरीचे वाचक फौजदार गणेश नावकर, गंगाझरीचे अवधूत बनकर, सालेकसाचे विजय गोपाळ, तिरोडाचे निखील कर्चे, श्वानपथक गोंदियाचे धर्मेंद्र मडावी, सशस्त्र दूरपरिक्षेत्र मुरकुटडोहचे (पिपरीया)े महेंद्र शहारे, गुन्हे तपास पथक गोंदियाचे रजनी तुमसरे, गोंदिया शहरचे संदीया सोमनकर, एओपी भरनोलीचे संदीप भोपळे, नक्षल आॅपरेशन सेल सालेकसाचे नितीन शिंदे, एओपी मगरडोहचे सुर्यकांत सपताळे, डुग्गीपारच्या निशा वानखेडे, नक्षलसेल गोंदियाचे कुलदीप कदम, एओपी मगरडोह बळीराम घंटे, सालेकसाचे गौरव देव, नवेगावबांधचे प्रतापसिंह शेळके, भिमराव बावरे, एओपी धाबेपवनीचे अभिजीत डेरे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, विशाल राजे, श्रीकांत डोंगरे, स्वप्नील उनवणे, डुग्गीपारचे केशव वाबळे, देवरी उपमुख्यालयातील जयदीप काटे व जितेंद्र बोरकर यांचा समावेश आहे. सोबतच गोंदियाचे मुख्य गुप्त वार्ता अधिकारी अमित सुरवसे, दिपेश गायधने, माया कथलेवार यांच्यासह ३०८ इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

27 मार्च ते 02 एप्रिल बेरार टाईम्स अंक बघण्यासाठी क्लिक कराृ- berartimes.com





Tuesday 26 March 2019

भंडारा लोकसभा क्षेत्रः 34 पैकी 11 उमेदवारांचे नामांकन रद्द

गोंदिया,दि26 : भंडारा - गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी करण्यात आली असून छाननी नंतर ३४ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले असून २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. २८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असून या नंतर चित्र स्पष्ट होणार आहेउमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे आहे
नामांकन वैध झालेले उमेदवार
नाना पंचबुध्दे (राष्ट्रवादी), विजया नांदुरकर (बसप), सुनील मेंढे (भाजप). कारू नान्हे (वंचित बहुजन आघाडी), भिमराव बोरकर (पीपीआयडी), भोजलाल मरस्कोल्हे (भाशचेपा), राजकुमार भेलावे (पीरिपा), अतुल हलमारे (अपक्ष), ग्यानिराम आमकर ( अपक्ष), निलेश कलचुरी(अपक्ष),प्रमोद गजभिये (अपक्ष), वीरेद्र जायस्वाल (अपक्ष) तारका नेपाल(अपक्ष), देवीदास लांजेवार (अपक्ष), राजू निर्वाण (अपक्ष). राजेंद्र पटले (अपक्ष), प्रकाश मालगावे (अपक्ष), खुशाल बोपचे (अपक्ष), दौलत मुनिश्वर (अपक्ष), विलास राऊत (अपक्ष) सुनील चवळे (अपक्ष), सुमित पांडे (अपक्ष) सुहार फुंडे (अपक्ष). 


छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर,दि.26 : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चार नक्षलवाद्यांना कंठस्थान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधिकारी सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतलनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात आज सकाळी सहाच्या सुमारास कारवाई झाली. काल सायंकाळी कर्कांगुडा गावाजवळील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती सीआरपीएफला मिळाली होती. त्यानुसार कमांडोंनी कर्कांगुडाजवळील जंगलास वेढा घातला. या वेळी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याच वेळी जवानांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चार नक्षलवादी मारले गेले. घटनास्थळी शस्त्रसाठा जप्त केला आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये 11, 18 व 23 एप्रिल रोजी या तीन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होत आहे. सुकमा जिल्हा नक्षलग्रस्त असन, येथे 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

दारूबंदी करणार्‍या दोन महिलांचे जाळले घर

गोंदिया,दि.26ः-छोटा गोंदिया व संजयनगर परिसरात अवैध दारू विक्रीसाठी काही महिलांनी कंबर कसली. दरम्यान, अवैध दारू विक्रेत्यांना दारू विक्री करू नये, अशी सूचनाही अनेकदा केली. एवढेच नव्हे तर पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र, अद्यापपयर्ंत संजयनगरात अवैध दारू विक्री सुरूच आहे. दुसरीकडे दारू विक्रीचा बंदोबस्त होत असल्याचे लक्षात घेऊन काही अवैध दारू विक्रेत्यांनी विरोध करणार्‍यांच्या घरी उपद्रव करण्याचा प्रकार सुरू केला आहे. २३ मार्च रोजी रात्री दोन घरांना आग लावण्यात आली. दरम्यान, दोन्ही घरातील दुचाकी जळून खाक झाले व मोठे नुकसान झाले. या प्रकाराला घेऊन (ता.२४) संजयनगर येथील शेकडो महिलांनी शहर पोलिस स्टेशन गाठून अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली.
संजयनगर, छोटा गोंदिया, गोविंदपूर परिसरात दारू विक्रीमुळे शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे. बच्चेकंपनी व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारू व्यसनामुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी महिलांनी गेल्या ८ महिन्यांपासून पुढाकार घेवून परिसरात दारूबंदीची हाक दिली. दरम्यान, परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांना दारू विक्री करू नये, अशी विनंतीही केली. एवढेच नव्हे तर शहर पोलिस स्टेशन, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन परिसरात दारूबंदीला सहकार्य करावे, अशीही विनंती करण्यात आली. मात्र, दारूबंदी होत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील महिला दररोज रात्री गस्त घालतात. त्यामुळे दारूविक्रेता आणि दारू ढोसणार्‍यांचा मज्जाव होत आहे. या प्रकाराला कंटाळून आता अवैध दारूविक्रेत्यांनीच दारू विक्रीचा बंदोबस्त करणार्‍या महिलांच्या कुटुंबाविरोधात उपद्रव सुरू केला आहे. (ता.२३) संजयनगर येथील कैलाश चव्हाण हे कुटुंबासह बाहेर गेले असताना त्यांच्या घराला आग लावण्यात आली. त्याचबरोबर सुरेश गडपायले हे कुटुंबासह घरी झोपले असताना यांच्याही घराला आग लावण्यात आली. अंगणात ठेवलेल्या दोन्ही कुटुंबातील मोटारसायकलींना आगीच्या स्वाधीन करण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेवून आगीला आटोक्यात आणले. मात्र, तोपयर्ंत दोन्ही दुचाक्या जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, काही लोकांनी आग लावून पळ काढताना काही लोकांनादेखील पाहिले. यावरून दारू विक्रेते षडयंत्र रचून नासधूस करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकाराला घेवून (ता.२४) दुपारी १२ वाजता सुमारास संजयनगर, छोटा गोंदिया, गोविंदपूर येथील शेकडो महिलांनी शहर पोलिस ठाणे गाठून अवैध दारू विक्रेते व त्यांना अभय देत असलेल्या पोलिसांविरूद्ध चांगलाच संताप व्यक्त केला. अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी महिलांनी लावून धरली होती.

सराईत पाकिटमार महिलेस अटक




गोंदिया ,दि.26ः- रेल्वे स्थानक परिसरात तसेच रेल्वे प्रवासात लहान मुलांना चोरणारी तसेच पाकिटमार करणारी टोळी सक्रीय असल्याच्या आधारावर रेल्वे सुरक्षा बलच्या टास्कफोर्सने विशेष मोहीम राबविली. दरम्यान, गोंदिया रेल्वे स्थानकावर एक महिला संशयास्पद स्थितीत आजाद हिंद एक्सप्रेसमध्ये चढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 या महिलेची कसून चौकशी केली असता, तिच्याकडे एटीएम, मोबाईल, लायसन्स, आधार कार्ड सापडले. दरम्यान, संबंधित कार्डधारकांशी संपर्क केले असता, ते चोरून नेल्याचेही उघडकीस आले. यावरून सदर सराईत पाकिटमार महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २३ मार्च रोजी दुपारी १२.१५ वाजता करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सोनी पिटर पी. एसबू (३0, रा. विजयावाडा, आंध्र प्रदेश) असे आहे. सदर महिला मुलांच्या चोरी प्रकरणातही सहभागी असल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रवासदरम्यान प्रवाशांचे पाकीट, मोबाईल व इतर साहित्य चोरी करणे तसेच लहान मुलांना चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती रेल्वे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांना प्राप्त झाली. या आधारावर टास्कफोर्सच्या माध्यमातून २२ व २३ मार्च रोजी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, २३ मार्च रोजी आजाद हिंद एक्सप्रेसमध्ये एक महिला संशयास्पद स्थितीत चढताना दिसून आली. या आधारावर तिला ताब्यात घेण्यात आले असता तिच्यासोबत असलेले लहान मुले पी. प्रेम व पी. चंदू या दोघांची दिशाभूल करीत असल्याचेही समोर आले. महिला सुरक्षा बलची कर्मचारी रजनी शर्मा हिने तिची तपासणी केली असता, तिच्याजवळ एटीएम, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, आयडी व दोन पर्स यामध्ये १९00 व १५00 रुपये आढळले. यावरून संबंधित ओळखपत्रातील फिर्यादी चंद्रभान बावणे रा. नागपूर, अविनाश बारेवार रा. गोंदिया या दोघांशी संपर्क केले असता, त्यांचे पर्स चोरी गेल्याचे समोर आले. दोन्ही फिर्यादीची गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा होती. यामुळे सदर महिला सराईत पाकिटमार व मुलांना चोरी करणार्‍या टोळीतील सक्रिय सदस्य असल्याची बाब समोर आली. या आधारावर आरोपी महिला सोनी पिटरच्या विरूद्ध गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई रेसुब व टास्कफोर्सचे उपनिरीक्षक विनेश मेश्राम, एम.बी. साहू, पी. दलाई, व्ही.आर. मडावी, आर. रायकवार, पी.एल. पटले, रजनी शर्मा यांनी केली.

Monday 25 March 2019

डॉ खुशाल बोपचे( भाजप ,अपक्ष ) राजेंद्र पटले भाजप कार्यकर्ता( अपक्ष) विजया नांदूरकर ( बसप) उमेदवारी अर्ज सादर

बेरार टाइम्स: 25
डॉ खुशाल बोपचे( भाजप ,अपक्ष ) राजेंद्र पटले भाजप कार्यकर्ता( अपक्ष) विजया नांदूरकर ( बसप) उमेदवारी अर्ज सादर...

भंडारा-गोंदिया मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नैराश्य


प्रफुल पटेलांनी मतदारसंघ सोडला वाऱ्यावर

गोंदिया,दि.25- लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून माजी केंद्रीय मंत्री आणि खा. प्रफुल्ल पटेल हे निवडणूक लढविणार, असे तर्क लढविले जात होते. या संदर्भातील अनेक बैठकांतून असेच संकेत मिळत असताना आज अखेरच्या दिवसी अचानक प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांना धक्का देत भंडाराचे नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली. परिणामी, राष्ट्रवादीसह काँंग्रेसच्या गोटात नैराश्य आणि संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, खा.प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघाचे पालकत्व सोडून या मतदार संघाला वाऱ्यावर तर सोडले नसावे ना, अशा प्रतिक्रिया सुद्धा आता उमटत आहेत.
भंडारा मतदार संघात भाजप या प्रतिस्पर्धी पक्षाच्या वतीने भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अंतिम क्षणापर्यंत आपला निर्णय राखून ठेवला होता. परिणामी, राष्ट्रवादी तर्फे खा. पटेल हेच रिंगणात राहतील, अशी आशा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये होती. यापूर्वी या मतदार संघातून अनेकदा पटेल यांना मतदारांनी संधी दिली.जातीय समीकरण काहीही असले तरी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादीची साथ पकडलेल्या प्रफुलभाईंना मतदारांनी सोडले नाही. अपवादात्मक परिस्थितीच पटेल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस सोडल्यानंतर प्रफुल भाईवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी या दोन्ही जिल्ह्यात जिवंत ठेवता आली. अन्यथा हा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नाही तर कॉग्रेसचे प्राबल्य आहे. भाईजींवरील असलेल्या प्रेमापोटी येथील मतदार हा जातीपातीच्या समीकरणांवर मात देऊन प्रत्येकवेळी भाईजींच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.
असे असताना पटेल यांनी भाजपच्या प्रभावाला घाबरत स्वतः रिंगणातून माघार घेतल्याचे आता प्रतिस्पर्धी बोलू लागले आहेत. त्यांच्या या आरोपाला आता उत्तर देताना राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे. भंडाराचे नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यामागचे असलेले तर्क हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पचनी पडले नसल्याने त्यांच्यामध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे.
काही कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, जर नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी द्यायचीच होती, तर एवढा वेळ हा विषय ताणून धरण्याचे काही कारण नव्हते. खरे तर पक्षाला निवडणुकीसाठी होकार देऊन ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून पटेल यांनी माघार घेत स्वतःच्या कार्यकर्त्यांचीच फसवणूक केल्याचा समज आता राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा झालेला दिसून येत आहे. निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवाराशी तुलना केली तर अत्यंत दुबळा आणि आजारी उमेदवार देण्याचे कारण न समजण्यापलिकडे असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहे. काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तर आता भाईजींनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याला वाऱ्यावर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा भाजपच्या तुलनेत अत्यंत दुबळा मानला जात असल्याने राष्ट्रवादीने प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी नांगी टाकल्याचे बोलले जात आहे.

एमबीबीएस विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

गोंदिया,दि.२४ :  शहरातील सिव्हील लाईन्स बालाजी चौक परिसरातील रहिवासी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी (दि.२४) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. 
आशिष भानूदास रहाणे (२०) रा.पळशी-झाशी, बुलढाणा असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.आशिष रहाणे व त्याचा मित्र विलास उईके (१९) रा.पोलीस लाईन,नागपूर हे सिव्हील लाईन्स परिसरातील संदीप नशिने यांच्या घरी भाड्याने रूम घेऊन १४ ऑगस्टपासून राहत आहेत. दोघे एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी असून रविवारी (दि.२४) दुपारी विलास हा आतल्या रूममध्ये झोपलेला असताना आशिषने समोरच्या खोलीत गळफास लावून घेतला. हा प्रकार उघडकीस येताच व त्याचा श्वास सुरू असल्याचे लक्षात घेत त्याला सायंकाळी ७ वाजतादरम्यान येथील वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.आशिषने नेमकी आत्महत्या कशामुळे केली कळू शकले नाही. या प्रकरणी शहर पोलिसांनी नोंद केली आहे.

प्रफुल्ल पटेल निवडणुक लढणार

गोंदिया, दि.२४ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल निवडणुक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पटेल हे निवडणुक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पटेल यांनी पक्षाला होकार कळवला आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रफुल्ल पटेल यांनीच ही जागा लढवावी असा आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पटेलांनी पक्षाला होकार कळवला आहे. कार्यकर्त्यांशी पटेल यांनी केली चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.शनिवारला रात्री नागपूरात माजी खासदार नाना पटोलेंसोबत झालेल्या बैठकीत पटोलेंनी विजय शिवणकरांना सोडून तुम्ही लढा किंवा भंडारा जिल्ह्यातील एका नेत्याला उमेदवारी द्या असे म्हटल्याची चर्चा आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.त्यानंतर पटोलेंनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीनंतर पटेलांशी चांगले मैत्रीपुर्ण संबध निर्माण झाले आहेत. दरम्यान, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपचे उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची अधिकृत घोषणा पक्षातर्फे झाली  आहे.

Sunday 24 March 2019

केवळ ‘भारत माता की जय’ म्हणणे हा राष्ट्रवाद नव्हे- व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.24: राष्ट्रवाद हा केवळ ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देण्याइतपत मर्यादित नाही. सर्वांसाठी ‘जय हो’ हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही धर्म, जात, शहरी-ग्रामीण या मुद्यांवरून लोकांशी भेदभाव करत असाल तर तुम्हाला ‘भारत माता की जय’ बोलण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. ते रविवारी दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धर्म, जातीयवाद आणि शहरी-ग्रामीण अशा भेदभावापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचार, निरक्षरता, भीती, भूक आणि जातीवादापासून मुक्त असलेल्या ‘न्यू इंडिया’वर देशातील युवकांनी लक्ष केंद्रीत करायला हवे. तरुणांनी समाजातील अनिष्ट प्रथा, कट्टरता आदींविरोधातील लढाईत सर्वात पुढे असायला हवे आणि लैंगिक समानता आदी गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्या स्वप्नातील ‘न्यू इंडिया’त हेच अपेक्षित आहे. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हा मुद्दाही बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. आपल्याला वसाहतवादी दृष्टीकोनाचा त्याग करावा लागेल. तसेच खरा इतिहास आणि प्राचीन नागर संस्कृती आणि परंपरा याबद्दल जाणून घेतले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभावनेचे बीज पेरले जाईल, असे व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.गेल्या काही वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने ७ टक्क्यांपेक्षा अधिक दराने विकसित होत आहे. आगामी १०-१५ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आपण समृद्ध भारतासाठी आणि रामराज्याची सुरुवात करण्याच्यादृष्टीने वाटचाल करायला पाहिजे, असेही नायडू यांनी सांगितले.

'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'


bjp mp subramaniam swamy claim that pm modi and finance minister arun jaitley have no knowledge of economics | 'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'

कोलकाता - भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे . 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही.भारताची अर्थव्यवस्थाजगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे  सांगत वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ते शनिवारी (23 मार्च ) कोलकाता येथे  आयोजित 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर बोलत होते.
सुब्रमण्यम स्वामी यांनी 'पंतप्रधान मोदी असं का सांगतात, हे मला कळत नाही. जीडीपीनुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे' असं म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. विनिमय दरांमध्ये सतत बदल होत असतात आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने जीडीपी गणनेच्या वैज्ञानिक पद्धतीच्या स्वीकारार्ह प्रक्रियेनुसार भारताची अर्थव्यवस्था ही सध्या सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. क्रयशक्ती क्षमता ही अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या गणनेची योग्य पद्धत आहे आणि त्याआधारे भारत सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे, असं ही स्वामी यांनी सांगितलं आहे. 

अखेर भंडारा लोकसभा मतदार संघात भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात

गोंदिया,दि.24- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघातून भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील फुंडे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. परिणामी, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांचे नाव आता भाजपच्या यादीतून बाद झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे डॉ. फुके यांचे नाव भाजपकडून अपेक्षित असल्याने श्री. फुके यांनी मतदार संघात अप्रत्यक्षरीत्या संपर्क अभियानास सुरवात केली होती.

डाॅ.फुके आज हनुमंताच्या चरणी,सोमवारला भरणार अर्ज




गोंदिया,दि.23ः-येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदावारांच्या नावाची घोषणा केली आहे.मात्र विदर्भातील चर्चेत असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर अद्यापही संस्पेस कायम ठेवला आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नसली तरी तिथे प्रफुल पटेल म्हणतील ते अंतिम असते.यातच आपली उमेदवारी पक्की असल्याचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय रमेश फुके यांना माहित असल्याने त्यांनी आढावा बैठकासंह सामाजिक बैठकांनाही सुरवात केली आहे.त्यातच आज शनिवारला(दि.23) ते भंडारा जिल्ह्यातील प्रसिध्द असलेेले हनुमान मंदिर चांदपूर येथे दर्शनासाठी जाणार आहेत.
चांदपूर येथे आज दर्शन घेऊन तिथेच त्या भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.त्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी व मंदिराकडे वळलेली पाऊले ही उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत असून सोमवारला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.त्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकसभा प्रभारी व जिल्हाध्यक्षांना मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना घेऊन येण्याकरीता निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान 5 ते 7 चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिले गेले आहे.अशा 200 ते 300 वाहनातून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत.फुके हे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन भेट घेत असून युवकांनाही पक्षात आणू लागले आहेत.या निवडणुकीत विधानपरिषदेसारखी मदत माजी खासदार नाना पटोले करतात की आघाडीला सहकार्य करतात याकडेही जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची जी यादी पहिली घोषित केली,त्या यादीमध्ये भंडारा नगराध्यक्षांचे नाव आल्याने ती घोषणा थांबविण्यात आल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.तर दुसरीकडे पक्षातील जे नेते खासदारकीसाठी इच्छुक आहेत,त्यांना तुम्हालाच उमेदवारी मिळेल घाई करु नका हा संदेश देण्यासाठीच ही घोषणा जाणिवपुर्वक ताटकळत ठेवण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.त्यातच मध्यप्रदेशातील भाजपच्या एका नेत्याने वरिष्टाकंडे कुठल्याही पोवार समाजातील उमेदवाराल तिकिटच देऊ नये यासाठी शिष्टमंडळासहच धाव घेतल्याच्या चर्चेला उधाण आल्याने त्यात कितपत सत्यता आहे हे सांगता येणे जरी कठीण आहे. तरी त्या मध्यप्रदेशातील नेत्याने गेल्या पाच वर्षात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजपमधील पोवार नेत्यामधील भांडण संपुष्ठात आणण्याएैवजी एकमेकाविरुध्द भांडण लावण्याच्याच प्रयाेग करुन समाजाच्या खच्चीकरणाला हातभार लावल्याचे काहींचे म्हणने आहे.

सोमवारी सकाळी 10 वाजता भरणार आघाडीचा उमेदवार अर्ज

भंडारा,दि.23ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आज शनिवारला(दि.23) माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी भंडारा येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत उमेदवार कोण राहणार हे तुम्हाला नक्कीच कळेल परंतु सोमवारला सकाळी 10 वाजता जलाराम लाॅन येथे एकत्रीत होऊन आपण आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करायला निघू असा संदेश दिला.यावेळी माजी आमदार सेवक वाघाये,जिया पटेल,प्रेमसागर गणविर,जिल्हा परिषद अध्यक्षासह इतर पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह आ.वाघमारे व भोंडेकरांचा फुकेना विरोध




गोंदिया/भंडारा,दि.23ः– भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात सुरु होताच बाहेरचा उमेदवार नको,स्थानिक उमेदवार द्या. मग तो कशाही असेल तर चालेल अशा प्रतिक्रिया गेल्या आठवड्यापासून सोशलमिडियावर जोमात सुरु आहेत.त्यातच तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे यांनीही पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारांची नावे निश्चित करतांना आम्हाला बाहेरचा उमेदवार नको मतदारसंघातील स्थानिक पातळीवरचाच हवा अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचेही समोर आले आहे.मतदारसंघात अनेक उमेदवार असल्यामुळे आम्हाला बाहेरचा उमेदवार नको अशी भूमिका आ.वाघमारेंची असल्याची चर्चा एैकायला येत आहे.त्यातच दोनदिवसापुर्वी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही डाॅ.फुंकेना आपला विरोध असल्याचे म्हटल्याचे वृत्त प्रसारित झालेले आहे.
लोकप्रतिनिधीसह कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात फुंकेच्या विरोधात असतानाच पक्षाने मात्र त्यानांच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेंने राजकीय वातावरण तापले गेले आहे.दरम्यान आमदार चरण वाघमारेंशी बेरार टाईम्संने सवांद साधला असता त्यांनी आपण आपली भूमिका पक्षाकडे मांडली आहे,सोबतच पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य राहील असे सांगत अधिक बोलणे टाळले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने भंडारा-गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून राजकीय अन्याय अत्याचार करुन नागपूरी नेत्यांना या मतदारसंघातील नेत्यांसह कार्यकर्त्यावर थोपवले जात असल्याच्या चर्चांना आता जोर धरु लागला आहे.अडीचवर्षापुर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही जिल्ह्यात उमेदवार असतांना त्यावेळी नागपूरातील कंत्राटदार व्यवसायाशी संबधित असलेले परंतु मुख्यमंत्र्याचे अगदी जवळचे असलेले डाॅ.परिणय फुकेंना विधानपरिषदेच्या रिंगणात उतरविण्यात आले.त्यावेळी ते माजी खासदार नाना पटोले हे भाजपमध्ये असल्यामुळे पटोलेंच्या प्रयत्नामुळे ते विजयी होऊ शकले.तो विजय बघून फुेंकना आपण लोकसभाही जिंकू शकतो अशा आत्मविश्वास निर्माण झाल्याने त्यांनी त्या पध्दतीने काम सुरु केले आणि लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच ते उमेदवाराच्या पहिल्या स्थानावर येऊन पोचले.परंतु फुकेवर नाना पटोलेंशी असलेली सलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेस व पटोलेंच्या कार्यकर्त्यांना काम देत असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक पातळीवर होऊ लागला आहे.तसेही पटोलेंशी सलगी फुंकेची काही लपून राहिलेली नाही हे सर्वश्रृत दिसून येत असल्याने आणि ते मतदारसंघाबाहेरील असल्यामुळेच त्यांचा विरोध दरदरोज वाढतांना दिसत आहे.
त्यातच त्यांनी आज शनिवारला तुमसर तालुक्यातील चांदपूर येथे हनुमंताचे दर्शन घेतले त्या वेळीही आमदार वाघमारेंची असलेली गैरहजेरी खुप काही बोलून जाणारी ठरली आहे.तर माजी खासदार शिशुपाल पटले जे राजकारणात नसल्यासारखेच आहेत ते आणि किसान गर्जेेचे अध्यक्ष राजेंद्र पटलेसह भंडारा जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे यांना घेऊन ते गेले.परंतु वाघमारेंची गैरहजेरी ही त्या मतदरासंघातील कार्यकर्त्यांची भूमिका सांगत असल्याचेही बोलले जात आहे.तिरोडा तालुक्यातील शिवसेनेच्या एका माजी पदाधिकार्यानेही फुकेंचा विरोध केला आहे.गोंदिया शहरातील निवडक पदाधिकारी,नगरसेवक वगळता फुंकेच्या बाजूने साधारण कार्यकर्ताही बाहेरचा उमेदवार बोलू लागल्याने फुंकेसमोर आव्हान उभे झाले आहे.त्यातच पक्ष कार्यकर्त्यासंह लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन एबीफार्म देते की आपल्या भूमिकेवर ठाम राहते हे सोमवारलाच दिसून येणार आहे.

Saturday 23 March 2019

तीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाला न्याय


देवरी,दि.23- तालुक्यातील  डोंगरगाव (सावली) येथील रहिवासी तुकाराम शिवा बहेकार या 80 वर्षीय वृद्धाला 30 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढयानंतर न्याय मिळाला. त्यामुळे श्री बहेकार यांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला.
सविस्तर असे की, डोंगरगाव येथील रहिवासी असलेले तुकाराम बहेकार आणि गोविंद मुनेश्वर यांच्यामध्ये घर आणि जमिनीचा वाद होता. सदर प्रकरण गोंदियाच्या दिवाणी न्यायालयात 1989 साली दाखल करण्यात आले. या वादाचा निवाडा हा सन 1994 साली श्री बहेकार यांच्या  बाजूने लावला. यावर मुनेश्वर यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली. अपिलात मात्र कनिष्ठ न्यायालयाचा निकाल मुनेश्वर यांच्या बाजूने फिरल्याने श्री बहेकार यांनी सदर प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले. यावर मा. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून श्री बहेकार यांचे बाजूने 2018 ला निर्णय दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी देवरीचे दिवाणी न्यायाधीश एस ए इंगळे यांनी कार्यवाही करून घर व जमिनीचा ताबा श्री बहेकार यांना मिळवून दिला. 

दोन व्यक्तिंना एकच आधार क्रमांक




गोंदिया,दि.23- भारत सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने आधार माध्यमातून व्यक्तिची ओळख पटवूण घेण्यासाठी आधार क्रमांक दिला जातो.तो क्रमांक हा देशभरातील एकमेव क्रमांक राहत असून दुसèयाला दिला जात नाही.परंतु गोंदिया जिल्ह्यातील एका महिलेला व नागपूर जिल्ह्यातील नांद येथील महिलेला दिलेला आधार क्रमांक एकच असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरण पौर्णिमा राजगिरे या महिलेच्या रोजगाराच्या कामाचा मोबदला देण्यासाठी बँकेतून पैसे घालण्यात आले.ती गावातील रस्ता बांधकामावर मजुरी करण्यासाठी गेली होती.त्या मजुरीचा पैसा देण्यासाठी आधार qलकच्या माध्यमातून पैसा देण्यात आला.परंतु सदर महिलेच्या खात्यात पैसे न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील रहिवासी असलेल्या पौर्णिमा प्रेमलाल राजगिरे यांना ५३५६ ९००२ ३४९४ हा आधार क्रमांक देण्यात आला आहे.तर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तहसिल नांद ग्रामंपचायत येथील रहिवासी असलेल्या नर्मदा भक्तीदास चुटे यांनाही ५३५६ ९००२ ३४९४ हाच क्रमांक देण्यात आल्याने शासकीय कार्यालयातील गोंधळ समोर आला आहे.याप्रकरणाचा तपास अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तपास केला असता नागपूर जिल्ह्यातील नर्मदा चुटे यांच्या नावे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे गेल्याचे समोर आले.त्यानंतर सदर महिलेचा पुर्ण पत्ता काढून त्याच्या पतीला माहिती देत पत्र देण्यात आल्याची माहितीही गटविकास अधिकारी जमईवार यांनी दिली.

Friday 22 March 2019

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर,भंडारा-गोंदिया सस्पेन्स

नवी दिल्ली/गोंदिया(वृत्तसंस्था)दि.21ः- लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. अशातच सर्व पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपनेदेखील धुलिवंदनाचे मुहुर्त साधून आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 184 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या 16 जागांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे.मात्र सर्वाधिक चर्चेत असलेली भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा न केल्याने संस्पेन्स कायम राहिला आहे.जेव्हा की या मतदारसंघातून नाना पटोले हे 2014 मध्ये लढले होते.त्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशी भांडण झाल्यानंतर त्यानी पक्ष सोडला होता.त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पटोलेंनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडीचा म्हणून निवड़ून आणले होते.
पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाहीर झाली आहेत.यात यादीत 182 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 16 जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
1- नागपूर – नितीन गडकरी
2- नंदुरबार – हिना गावित
3- धुळे – सुभाष भामरे
4- रावेर – रक्षा खडसे
5- अकोला – संजय धोत्रे
6- वर्धा – रामदास तडस
7- चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
8- जालना – रावसाहेब दानवे
9- भिवंडी – कपिल पाटील
10- मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी
11- मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन
12- नगर – सुजय विखे
13- बीड – डॉ. प्रीतम मुंडे
14- लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
15- सांगली – संजयकाका पाटील
16- सुजय विखे पाटील

साधे जेवण १०० तर नॉनवेज २००; उमेदवारांसाठी मेनूकार्ड

गोंदिया,दि.20ः- साधे जेवण १०० रुपये, नॉनवेज २००, नास्ता २५, शीतपेय २०, कॉफी १२ आणि चहा ७ रुपये…. कुठल्याही हॉटेलचे हे मेनूकार्ड नसून निवडणूक आयोगाने लोकसभेच्या उमेदवारांसाठी नेमून दिलेले हे दरपत्रक आहे. खर्च लपविण्यासाठी वेगवेगल्या क्लुप्त्या करणाऱ्या उमेदवारांवर वॉच ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ही खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याचेही या दरपत्रकावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने ७० लाखांची मर्यादा आखून दिली आहे. या मर्यादेपलीकडे खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. निवडणूक आयोगाच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवित असतात. निवडणुकीत होऊ द्या खर्च म्हणत उमेदवारांकडून अनियंत्रित खर्च करण्याची मानसिकता बळावते. या मानसिकतेवर नियंत्रण मिळविण्यासाठीच निवडणूक आयोगाने विविध वस्तूंची दरसूची तयार केली असून राजकीय प्रतिनिधींच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवडणुकीतील खर्चाचे दर (रुपयांत)
मेनू : २००९ : २०१४ : २०१९
साधे जेवण : ४० : ७५ : १००
नॉनवेज : ५० : १५० : २००
नास्ता : १० : २५ : २५ : २५
शीतपेय : १० : १५ : २०
कॉफी : ५ : १० : १२
चहा : ३ : ५ : ७
सर्वांना समान संधी
सभा, रॅली, जाहिराती यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जोतो. खर्च लपविण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसतात. पैशांच्या भरवश्यावर उमेदवार अधिक सक्षम बनू नये, सर्वांना समान संधी मिळावी यासाठी उमेदवारांच्या खर्चावर बंधणे घालण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ७० लाख आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २८ लाखापर्यंत खर्चाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. अंतिम खर्च म्हणून उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यात संपूर्ण खर्च आणि खर्चाच्या स्त्रोतचाही उल्लेख करावा लागतो.
तर होणार कारवाई
उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास भारतीय निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १० ए नुसार उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे आता उमेदवाराला याच मर्यादेत खर्च सादर करणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांना निवडणूक खर्च करण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते काढण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र काही उमेदवारांनी या व्यतिरिक्त दुसऱ्या खात्यातून खर्च करत असल्याचेही आढळून येते, अशा उमेदवारांना नोटीस पाठविण्यात येते.

इथे वाढली महागाई
२००९ लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या खर्चाच्या दरसूचीच्या तुलनेत २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले दर दुप्पट, तिप्पट तर काही वस्तूंचे दर तर चौपट वाढले होते. महागाई वाढली नसल्याचे दावे करण्यात येत असले तरी निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या दरपत्रकाकडे बघितले तर गेल्या पाच वर्षांत अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...