लाखनी,दि.02-स्वर्णकार समाज व सुवर्ण सखी महिला समाज संघटना लाखनी च्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या मध्ये सर्व समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवून मोठ्या थाटात पुण्यतिथी सोहळा साजरा केला. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील जेष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले. चिमुकल्यासाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment