Thursday 14 March 2019

भाजप खासदाराचा मुलगा अमली पदार्थासह पोलिसाच्या जाळ्यात

मध्य प्रदेश,द.14 - देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असताना मध्य प्रदेशमधील एका भाजप खासदाराचा मुलगा ड्रग्ससहित पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. निवडणुकीचे वारे संबंध देशात वाहत असताना सर्व उमेदवार आपल्या प्रतिमेला धक्का बसणार नाही याची काळजी घेत आहेत. मात्र, मध्य प्रदेशमधील भाजप खासदाराच्या मुलाला अमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असं या भाजप खासदाराचे नाव आहे. तर सत्येंद्र हे त्यांच्या आरोपी मुलाचे नाव आहे.
मंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती. तेव्हा सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी पोलिस पथकाने त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी थांबवली नाही तर याउलट त्याने आपली कार भरधाव नेली. त्यावरून पोलिसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी कारची तपासणी केल्यावर पोलिसांना कारमध्ये अमली पदार्थ आढळून आले.  त्यांना आज न्यायालयात हजर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघड झाला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक परिहार यांनी दिली. संपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले आहेत. सत्येंद्रवर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...