वाशिम,दि.१४ः-यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यासदंर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी १४ मार्च रोजी कारंजा येथील एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक नाकाडे रा. मंगरुळपीर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली की, फिर्यादी हे त्यांचा मित्र जुबेर मोहनावाले याने खासदार भावना गवळी यांच्यासंदर्भात फेसबुकवरील पोस्ट, कमेन्ट पाहत असताना आरोपी साद पठाण रा. कारंजा लाड याने गवळी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली. या तक्रारीवरून आरोपी पठाण याच्याविरुद्ध मंगरूळपीर पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ तसेच भा. दं. वि. कलम ५०१ नुसार गुन्हा दाखल केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment