Friday, 1 March 2019

मार्कंडा यात्रेत भाविकांवर २८ कॅमेऱ्यांची नजर राहणार

गडचिरोली,दि.01 मार्च(अशोक दुर्गम) : जिल्ह्यातील मार्कंडा येथील महाशिवरात्रीनिमि्त भरणारी आठ दिवसांची महत्वपूर्ण राहत असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील नागरिक या यात्रेत सहभागी होतात.वैनगंगा नदीकाठावर चामोर्शी तालुक्यात हेमाडपंथी कलाकुसर असलेल्या या मंदिराचे मोठे महत्व आहे.त्यामुळे यात्रेदरम्यान अनुचित घटनांवर नजर ठेवण्यासाठी २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, एसडीओ नितीन सद्गिर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, तहसीलदार अनिरूध्द कांबळे, बीडीओ एम. एन. माने, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक सवरंग शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्या, असे निर्देश दिले.
नावेने प्रवास करणाºया भाविकांना लाईफ जॅकेट पुरविले जाईल, वीज पुरवठा खंडीत झाल्यास जनरेटरची सुविधा राहिल, मंदिरात व्हीआयपी रांग राहणार असून यात फक्त गर्भवती माता, वृध्द नागरिक, अपंग व्यक्ती यांना प्रवेश दिला जाईल. नदीवर सोलर फ्लॅश लावला जाईल. तो पाण्याच्या आतून सुध्दा चमकत राहिल. जिथे खोल पाणी आहे, तिथे सोलर फ्लॅश लावला जाणार आहे. अग्निशमन वाहने सुध्दा ठेवली जाणार आहेत. मोबाईल कव्हरेज राहावे, यासाठी स्वतंत्र मोबाईल टॉवर व्हॅन बसविण्याची सूचना बीएसएनएलच्या अधिकाºयांना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...