मुंबई,दि..29: भाजपच्या काही वादग्रस्त नेत्यांची बेताल वक्तव्य करण्याची खोड काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. वादग्रस्त विधानांच्या मालिकेत आता भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचे सुद्धा नाव जोडले गेले आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना 'लावारीस' लावारिस संबोधून अख्या देशाच्या पोशिंद्याची इभ्रत रस्त्यावर मांडली आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांचा तोल सुटला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे त्यांचेसह भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ ट्विटरवर 'चौकीदार अवधूत वाघ' या अकाऊंटवरुन सक्रिय आहेत. याच अकाऊंटवरुन त्यांनी एक ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना हिनवले आहे. मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी पातळी सोडली. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला 'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा...', असं उत्तर वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
याआधी भाजपच्या विद्वान नेत्यांनी बरीच वादग्रस्त विधाने केल्याची उदाहरणे समोर आली होतीय
No comments:
Post a Comment