Tuesday 5 March 2019

अवघ्या दीड तासात मोबाईल चोरट्याला अटक




गोंदिया,दि. ५ : गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विर्शाम कक्षातून रेल्वे प्रवाशाचे मोबाईल लंपास करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलच्या टास्क फोर्सने अवघ्या दीड तासात चोरट्याला जाळ्यात अडकविले.
 ही घटना ३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता सुमारास घडली. गोंदिया रेल्वे सुरक्षा बलचे टास्क फोर्स रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना, विर्शाम कक्षात बसलेला प्रवासी अनिल सुखराम उके याने आपले मोबाईल चोरीस गेल्याची माहिती दिली. घटनेची तूर्त दखल घेत सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली असता, सोनू गणेश शहारे (२४, रा. डोंगरगड, जि. राजनांदगाव ,छ.ग.) याला संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडे फियार्दीकडून लंपास केलेले मोबाईलही सापडले. या घटनेची नोंद गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अवघ्या दीड तासात गोंदिया रेल्वे टास्क फोर्सने चोरट्याला जाळ्यात अडकविण्यात यश मिळाले. ही कारवाई रेल्वे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्सचे उपनिरीक्षक विनेक मेर्शाम, प्रधान आरक्षक पी. दलाई, जी.आर. मडावी, आर. रायकवार, पी.एल. पटेल, विकास पटेल, भगवान जायस्वाल यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...