Friday, 15 March 2019

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिऱ्हेपुंजे भाजपात

गोंदिया,दि.15ः- शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले सडक अर्जुनी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषराव गिर्हेपुंजे यांनी आज(दि.15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
गिर्हेपुंजे हे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा गणेशोत्सोत्व कार्यकाळापासूनच होते.त्यावर आज शिक्कामोर्तंब झाले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. पालकमंत्री बडोले यांनी पक्षाचा दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी प्रामुख्याने आमदार डॉ परिणय फुके, आमदार संजय पुराम, आमदार राजेश (बाळा) काशिवार, भंडारा नगराध्यक्ष सुनील मेंढे, जिल्हा महामंत्री(संघटन) वीरेंद्र अंजनकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष विजय बिसेन, सविताताई पुराम, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...