Thursday, 14 March 2019

आ.अग्रवालांच्या पुढाकाराने बीएसएनएलचा खंडीत वीजपुरवठा पुर्ववत


गोंदिया,दि.13 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने थकबाकी असल्यामुळे दुरसंचार निगमचा (बीएसएनएल) वीजपुरवठा खंडीत केला होता. त्यानंतर सोमवारी (दि.११) बीएसएनएल गोंदिया कार्यालयाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. बीएसएनएल कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरातील ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. दरम्यान वीज मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी वीजजोडणी पूर्ववत करवून दिली. विशेष म्हणजे, राज्यात फक्त गोंदिया टेलीफान एक्सचेंजची वीज जोडणी कापण्यात आली आहे.मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरणने अवघ्या राज्यातच ‘बीएसएनएल’ची बत्तीगुल केली होती.
यामुळे जिल्हावासीयांना मागील ८-१0 दिवसांपासून त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी (दि.९) वीज मंडळाचे व्यवस्थापकीय संचालन संजीवकुमार यांच्याशी संपर्क साधून वीजजोडणी करून देण्याची मागणी केली होती. दरम्यान, वीज मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी केवळ ‘बीएसएनएल’च्या गोंदिया एक्सचेंजची वीजजोडणी करून दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...