मोहाडी , दि २ मार्च :: रेती माफिया वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर ट्रक चालवायला घाबरत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले जावे. जोखीम पत्करु नका. कुटूबाची काळजी घ्या. सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात, असे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू म्हणाल्या.त्या पोलीस ठाणे मोहाडी येथे आयोजित सरपंच, पोलीस पाटील, दक्षता समिती सदस्यांच्या संवाद सभेत बोलत होत्या.यावेळी संवाद सभेत पोलीस अपविभागीय अधिकारी रिना जनबंधू यांनी सर्व उपस्थितांची ओळख करुन घेतली. गावात काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले तसेच अडचणी व समस्यांची माहिती घेतली. यावेळी संवाद सभेला सरपंच, पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मोहाडी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक गभणे यांची उपस्थिती होती. रेती चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस पाटलांच्या नियुक्त्या करु नयेत असा प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना रिना जनबंधू यांनी रेती माफियांची दहशत असल्याचे अप्रत्यक्ष सुचविले. त्यासाठी आपले जीव धोक्यात घालू नका असा सल्ला दिला. रेती माफियांचा कसा बंदोबस्त करायचा ते आम्ही बघून घेवू. सरपंचांनी गावाच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधला पाहिजे. रेती ‘चोरी’ होते असा संदर्भ देवून तक्रार करा. रेतीशिवाय अन्य अवैध व्यवसाय गावात, परिसरात होत असतील. त्याची खबर दया त्याची तात्काळ दखल घेवू. अलीकडे मुली पळून जाण्याचे प्रकार वाढलेत. त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या. एखादी घटना आटोक्याबाहेरची असेल, गुन्हा घडण्याची शक्यता असल्यास तात्काळ पोलीस स्टश्ोनला खबर द्यावे, कोणत्याही घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे. गावातील लहान गुन्हे पंचाच्या, तंटामुक्त समितीच्या माध्यमाने सोडवावे. दोन गटात, व्यक्तीत तणाव होत असेल तर समन्वय करावे असा विश्वास त्यांनी संवाद सभेत व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी, महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांच्या मदतीने वाद मिटविण्यास मदत होत होईल त्याकरीता सहकार्य करुन पोलीस व जनतेचे नाते दृढ करावे, असे सांगितले.
No comments:
Post a Comment