Monday, 25 March 2019

प्रफुल्ल पटेल निवडणुक लढणार

गोंदिया, दि.२४ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल निवडणुक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पटेल हे निवडणुक लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पटेल यांनी पक्षाला होकार कळवला आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रफुल्ल पटेल यांनीच ही जागा लढवावी असा आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच पटेलांनी पक्षाला होकार कळवला आहे. कार्यकर्त्यांशी पटेल यांनी केली चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.शनिवारला रात्री नागपूरात माजी खासदार नाना पटोलेंसोबत झालेल्या बैठकीत पटोलेंनी विजय शिवणकरांना सोडून तुम्ही लढा किंवा भंडारा जिल्ह्यातील एका नेत्याला उमेदवारी द्या असे म्हटल्याची चर्चा आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.त्यानंतर पटोलेंनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीनंतर पटेलांशी चांगले मैत्रीपुर्ण संबध निर्माण झाले आहेत. दरम्यान, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपचे उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष सुनील मेंढे यांची अधिकृत घोषणा पक्षातर्फे झाली  आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...