देवरी,दि.01 तालुक्यातील शिलापूर घाटावरून आणि देवरी परिसरातून होत असलेल्या अवैध वाळू तस्करांवर आज 12:15 च्या सुमारास तालुका प्रशासनाने धाड टाकून दोन लाख चार हजाराचा महसूल गोळा केला. सदर कार्यवाही तहसीलदार विजय बोरुडे यांनी केली.
प्रशासनाला शिलापूर रेती घाटावरून अवैध वाळू उपसा व वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने आज तहसीलदार विजय बोरूडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घाटावर धाड टाकली या धाडीत शिलापूर येथील जागेश्वर भोयर याचे मालकीचे 1 ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले. यानंतर देवरी परिसरातील विना नंबर च्या धर्मराज मानकर रा कन्हलगाव यांच्या मालकीचे 1 ट्रॅक्टर जप्त केले. यामध्ये वाहनावर जप्तीची कार्यवाही करून एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा दंड ठोठावला
No comments:
Post a Comment