कोलकाता - भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे . 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही.भारताची अर्थव्यवस्थाजगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सांगत वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ते शनिवारी (23 मार्च ) कोलकाता येथे आयोजित 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर बोलत होते.
सुब्रमण्यम स्वामी यांनी 'पंतप्रधान मोदी असं का सांगतात, हे मला कळत नाही. जीडीपीनुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे' असं म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. विनिमय दरांमध्ये सतत बदल होत असतात आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने जीडीपी गणनेच्या वैज्ञानिक पद्धतीच्या स्वीकारार्ह प्रक्रियेनुसार भारताची अर्थव्यवस्था ही सध्या सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. क्रयशक्ती क्षमता ही अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या गणनेची योग्य पद्धत आहे आणि त्याआधारे भारत सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे, असं ही स्वामी यांनी सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment