मुंबई,दि.30(विशेष प्रतिनिधी): कसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी राहिलेले प्रविण गायकवाड यांनी काँग्रेस आज पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसच्या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला रावेरची जागा सोडण्यात आली होती. त्याठिकाणी पक्षाचा उमेदवार म्हणून उल्हास पाटील यांची घोषणा केली . मात्र , पुण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून तो संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असे म्हणत या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु आहे. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून देखील इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. काल तर लोककलावंत सुरेखा पुणेकरांचे नावही देखील चर्चेत आले होते. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि पुण्यात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर गायकवाड यांचे मागे पडलेले नाव पुन्हा पुढे आले . लोकसभेच्या उमेदवारीचा मनसुबा ठेवत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, लोकसभेचे तिकीट हे माझ्यादृष्टीने महत्वाचे विषय नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील माझ्या पाठीराख्यांना वाटते की, आपल्या माणसाला तिकीट मिळालाय हवे. ते मिळाले तर त्याचा फायदा राज्यभरात होईल. नेतेमंडळी काही कारणांमुळे बाहेर असल्याने पक्ष प्रवेशाची प्रक्रिया लांबली होती.
No comments:
Post a Comment