Monday, 4 March 2019

किती दहशतवादी मेले हे मोजणे आमचे काम नव्हे-वायूसेना प्रमुख बी.एस.धनुआ

कोईम्बतूर(एएनआय)दि.04 –  भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच हा राजकीय मुद्दाही बनत चालला होता. त्या पार्श्वभूमीवर वायू सेनेकडून प्रथमच अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणे आमचे काम नाही, असे भारतीय वायू सेनेचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकसंदर्भात खुलासा केला आहे.त्यामुळे वृत्तवाहिन्यांह इतरांनी दाखविलेल्या आकड्यावर शंका निर्माण झाली आहे.
भारताने पाकिस्तानच्या सरहद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एयर सर्जिकर स्टा्रईक केला आहे . 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात यावरुन राजकारण सुरू झाले होते. विरोधी पक्षांकडून नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी होत होती. तर, पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात कुठलिही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय वायू सेनेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्ही फक्त आमचं टार्गेट साधतो, आणि त्यावर मारा करतो. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किती, जिवीतहानी झाली, हे मोजणे आमचं काम नाही, ते सरकार पाहिल, असे वायू सेना प्रमुख बी.ए. धनुआ यांनी म्हटले आहे. तसेच मिग 21 हे विमान सक्षम असे फायटर जेट आहे. त्यामध्ये उच्च दर्जाची शस्त्रास्त्र आणि मिसाईल सिस्टीम आहे. देशाकडील सर्वच एअरक्राफ्ट उत्कृष्ट दर्जाची असल्याचेही धनुआ यांनी म्हटले.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे गुजरातमध्ये रविवारी (3 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असे म्हटले. त्यानंतर, कोईम्बतूर येथे सोमवारी एअर मार्शल धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्यासंदर्भात खुलासा केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...