Monday, 11 March 2019

पीएसआयच्या परीक्षेत सानगडीचा विवेक विदर्भात पहिला


भंडारा,दि.10ःःमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत सानगडी येथील विवेक हरिश्‍चंद्र झिंगरे हा विदर्भातून प्रथम तर महाराष्ट्रात १६ व्या क्रमांकावर आला आहे.विवेक हा साकोली तालुक्यातील सानगडी येथील रहिवासी असून, त्याचे शिक्षण बीएससी, एम.ए. (प्रशासन) पर्यंत झालेले आहे. त्याचे वडिल सेवानवृत्त पोलिस निरीक्षक आहेत. त्याच्या यशाबद्दल सेवानवृत्त उपशिक्षणाधिकारी यशवंतराव खंडाईत, पत्रकार मनोहर लोथे, चंद्रशेखर खंडाईत, गणेश तानेलवार, सरपंच विजय खंडाळकर, डॉ. चेतन गायधने, चुन्नीलाल लोथे, नितीन चंद्रवंशी, शिवाजी खंडाईत, तंमुस अध्यक्ष व्यंकटसिंह खंडाते, विलास रहेले, लालाचंद कारंजेकर यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...