Monday 18 March 2019

एसपी कार्यालयात अभ्यागत व्यवस्थापन सिस्टिम

गोंदिया,दि.18 : पोलीस अधीक्षक कार्यालयात दररोज नागरिक त्यांच्या कामानिमित्त येतात. त्यांना पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना भेटावयाचे असते. अशा नागरिकांचे काम कमीत कमी वेळात पूर्ण होऊन त्यांचे समाधान व्हावे, याकरिता पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अभ्यागत व्यवस्थापन सिस्टिम हा अभिनव उपक्रम सुरू करण्याचे निश्चित केले होते. त्याकरिता एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्याचे उद्घाटन(दि.१७)गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते तसेच पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वागत कक्षात करण्यात आले. .
हा उपक्रम सुरू करण्यामागे पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या तक्रारी, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, पासपोर्ट आणि इतर तक्रारींचा निपटारा त्वरित व्हावा हा हेतू आहे. तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची नोंद संगणकाद्वारे होणार आहे. या कामाकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वागत कक्षात दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यालयात येणाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक, ते ज्या कामाकरिता आले त्या कामाचे स्वरूप आणि आलेल्या अभ्यागताचे छायाचित्र घेण्यात येणार आहे. ते ज्या कामाकरिता कार्यालयात आले होते, त्या कामाचे काय झाले या सर्व नोंदी घेतल्या जाणार आहेत. या सर्व कामांचा आढावा स्वत: पोलीस अधीक्षक घेणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागणार असल्याचा आशावाद पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...