Tuesday 26 March 2019

छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर,दि.26 : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चार नक्षलवाद्यांना कंठस्थान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधिकारी सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतलनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात आज सकाळी सहाच्या सुमारास कारवाई झाली. काल सायंकाळी कर्कांगुडा गावाजवळील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती सीआरपीएफला मिळाली होती. त्यानुसार कमांडोंनी कर्कांगुडाजवळील जंगलास वेढा घातला. या वेळी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याच वेळी जवानांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चार नक्षलवादी मारले गेले. घटनास्थळी शस्त्रसाठा जप्त केला आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये 11, 18 व 23 एप्रिल रोजी या तीन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होत आहे. सुकमा जिल्हा नक्षलग्रस्त असन, येथे 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...