गडचिरोली,दि.11 -कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजार परिसरात नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना रविवारी सायकांळच्या सुमारास घडली. योगेंद्र मेश्राम (रा. बोटेझरी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.ते गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.
रविवारी ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात मेश्राम गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या केली. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कोटगुल पोलीस मदत केंद्रात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.जखमीवस्थेत योगेंद्र मेश्राम यांना कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र टेकाम यांनी जाहिर केले. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे घटनेचा तपास करीत आहेत.मेश्राम यांची पत्नी कस्तुरबा चंदू देवगडे या बोटेझरी येथे कंत्राटी आरोग्य सेविका असून दर शनिवारी पत्नीकडे यायचे.
No comments:
Post a Comment