Friday, 1 March 2019

ओबीसी संघटना घालणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

गडचिरोली,दि.28ः– राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा देसाईंगजच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ओबीसी समाजाच्या मागण्या 2019 च्या लोकसभा निवडणुकापुर्वी मान्य न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ओबीसी समाजाची जनगणना घोषीत करण्यात यावी. गावांचे पुनर्निरिक्षण करुन फेररचना करण्यात यावी. अनुसूचित  जमातीची लोकसंख्या 50 टक्यापेक्षा कमी असलेल्या गांवाना पेसातून वगळण्यात यावे. गडचिरोली जिल्ह्यात वर्ग 3 व 4 साठी असलेले 6 टक्के ओबीसी आरक्षण रद्द करुन 19 टक्के पुर्ववत करण्यात यावे, यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात 19 टक्यापेक्षा कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यात यावे. अन्यथा लोकसभा निवडणुकीवर ओबीसी समाज बहिष्कार घालणार अशा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना रमाकांत ठेंगरे जि प सदस्य गडचिरोली , प्रा. शेषराव येलेकर उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, प्रा. दामोदर शिंगाडे, लोकमान्य बरडे अध्यक्ष देसाईगंज तालुका, पंकज धोटे सचिव, जितेंद्र ठाकरे अध्यक्ष आरमोरी तालुका, हिरालाल शेंडे, शंकर पारधी, दीपक प्रधान, सुरज लोथे, इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...