गोंदिया,दि.०६-देशात वाढत्या सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक विषमतेमुळे तसेच महागाई,भष्ट्राचार,बेरोजगारी व जातीय भेदभावामुळे सामान्य नागरिकांचे जिवन जगणे कठीण झाले आहे.देशातील समाज घटकांना समान न्याय मिळावा,पुरेशे प्रतिनिधीत्व मिळावे आदी बाबींना घेऊन ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आमगाव तहसिलदारमार्फेत निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात ओबीसी,एसी,एसटी समाजाच्या आरक्षणाची संपुर्ण अमलबजावणी न करता सर्वण समाजाला दिलेले असैवधानिक १० टक्के आरक्षण रद्द करण्यात यावे.१३ पार्इंट रोस्टर रद्द करु २०० पार्इंट रोस्टरप्रणाली पुर्ववत करणे,१९९७ च्या सबरवाल अहवालानुसार मागासजातींचा अनुशेष पुर्ण करण्यात यावे.न्यायपालिका व खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे,आदिवासींना जल,जंगल व जमिनापासून वंचित न करता त्याची मालकी अबाधित ठेवणे,स्वामीनाथन आयोग लागू करणे,नॉनक्रिमिलेयरची असैवंधानिक अट रद्द करणे,ओबीसीसह मराठा,ब्राम्हण आदी सर्व जातींची जनगणना करुन संख्येच्याप्रमाणात प्रतिनिधीत्व देणे आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबविणे आदी मागण्याचा समावेश आहे.निवेदन देतेवेळी,प्रा.बी.एम.करमकर,डॉ. गुरुदास येडेवार,सावन कटरे,धिरज ठाकरे,लिलाधर गिर्हेपुंजे,सुनिल ब्राम्हणकर,मुकेश उजवने,योगेश रामटेके,हरिष ब्राम्हणकर,राधाकिसन चुटे,हितेश चकोले,संजय बोहरे,बालू वंजारी,धर्मदिप चंद्रिकापुरे,संतोष कुंभलकर,कृष्णा बहेकार,संतोष मेंढे,संजय उके,मिनल श्रीभ्रदे,मोहनqसह खान,धर्मेंद्र नागरिकर,मधू मारवाडे व राजेश साखरकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment