गोंदिया/भंडारा,दि.23ः– भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात सुरु होताच बाहेरचा उमेदवार नको,स्थानिक उमेदवार द्या. मग तो कशाही असेल तर चालेल अशा प्रतिक्रिया गेल्या आठवड्यापासून सोशलमिडियावर जोमात सुरु आहेत.त्यातच तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे यांनीही पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारांची नावे निश्चित करतांना आम्हाला बाहेरचा उमेदवार नको मतदारसंघातील स्थानिक पातळीवरचाच हवा अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचेही समोर आले आहे.मतदारसंघात अनेक उमेदवार असल्यामुळे आम्हाला बाहेरचा उमेदवार नको अशी भूमिका आ.वाघमारेंची असल्याची चर्चा एैकायला येत आहे.त्यातच दोनदिवसापुर्वी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही डाॅ.फुंकेना आपला विरोध असल्याचे म्हटल्याचे वृत्त प्रसारित झालेले आहे.
लोकप्रतिनिधीसह कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात फुंकेच्या विरोधात असतानाच पक्षाने मात्र त्यानांच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेंने राजकीय वातावरण तापले गेले आहे.दरम्यान आमदार चरण वाघमारेंशी बेरार टाईम्संने सवांद साधला असता त्यांनी आपण आपली भूमिका पक्षाकडे मांडली आहे,सोबतच पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य राहील असे सांगत अधिक बोलणे टाळले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने भंडारा-गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून राजकीय अन्याय अत्याचार करुन नागपूरी नेत्यांना या मतदारसंघातील नेत्यांसह कार्यकर्त्यावर थोपवले जात असल्याच्या चर्चांना आता जोर धरु लागला आहे.अडीचवर्षापुर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही जिल्ह्यात उमेदवार असतांना त्यावेळी नागपूरातील कंत्राटदार व्यवसायाशी संबधित असलेले परंतु मुख्यमंत्र्याचे अगदी जवळचे असलेले डाॅ.परिणय फुकेंना विधानपरिषदेच्या रिंगणात उतरविण्यात आले.त्यावेळी ते माजी खासदार नाना पटोले हे भाजपमध्ये असल्यामुळे पटोलेंच्या प्रयत्नामुळे ते विजयी होऊ शकले.तो विजय बघून फुेंकना आपण लोकसभाही जिंकू शकतो अशा आत्मविश्वास निर्माण झाल्याने त्यांनी त्या पध्दतीने काम सुरु केले आणि लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच ते उमेदवाराच्या पहिल्या स्थानावर येऊन पोचले.परंतु फुकेवर नाना पटोलेंशी असलेली सलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेस व पटोलेंच्या कार्यकर्त्यांना काम देत असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक पातळीवर होऊ लागला आहे.तसेही पटोलेंशी सलगी फुंकेची काही लपून राहिलेली नाही हे सर्वश्रृत दिसून येत असल्याने आणि ते मतदारसंघाबाहेरील असल्यामुळेच त्यांचा विरोध दरदरोज वाढतांना दिसत आहे.
त्यातच त्यांनी आज शनिवारला तुमसर तालुक्यातील चांदपूर येथे हनुमंताचे दर्शन घेतले त्या वेळीही आमदार वाघमारेंची असलेली गैरहजेरी खुप काही बोलून जाणारी ठरली आहे.तर माजी खासदार शिशुपाल पटले जे राजकारणात नसल्यासारखेच आहेत ते आणि किसान गर्जेेचे अध्यक्ष राजेंद्र पटलेसह भंडारा जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे यांना घेऊन ते गेले.परंतु वाघमारेंची गैरहजेरी ही त्या मतदरासंघातील कार्यकर्त्यांची भूमिका सांगत असल्याचेही बोलले जात आहे.तिरोडा तालुक्यातील शिवसेनेच्या एका माजी पदाधिकार्यानेही फुकेंचा विरोध केला आहे.गोंदिया शहरातील निवडक पदाधिकारी,नगरसेवक वगळता फुंकेच्या बाजूने साधारण कार्यकर्ताही बाहेरचा उमेदवार बोलू लागल्याने फुंकेसमोर आव्हान उभे झाले आहे.त्यातच पक्ष कार्यकर्त्यासंह लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन एबीफार्म देते की आपल्या भूमिकेवर ठाम राहते हे सोमवारलाच दिसून येणार आहे.
No comments:
Post a Comment