गोंदिया,दि.23- भारत सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने आधार माध्यमातून व्यक्तिची ओळख पटवूण घेण्यासाठी आधार क्रमांक दिला जातो.तो क्रमांक हा देशभरातील एकमेव क्रमांक राहत असून दुसèयाला दिला जात नाही.परंतु गोंदिया जिल्ह्यातील एका महिलेला व नागपूर जिल्ह्यातील नांद येथील महिलेला दिलेला आधार क्रमांक एकच असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरण पौर्णिमा राजगिरे या महिलेच्या रोजगाराच्या कामाचा मोबदला देण्यासाठी बँकेतून पैसे घालण्यात आले.ती गावातील रस्ता बांधकामावर मजुरी करण्यासाठी गेली होती.त्या मजुरीचा पैसा देण्यासाठी आधार qलकच्या माध्यमातून पैसा देण्यात आला.परंतु सदर महिलेच्या खात्यात पैसे न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथील रहिवासी असलेल्या पौर्णिमा प्रेमलाल राजगिरे यांना ५३५६ ९००२ ३४९४ हा आधार क्रमांक देण्यात आला आहे.तर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तहसिल नांद ग्रामंपचायत येथील रहिवासी असलेल्या नर्मदा भक्तीदास चुटे यांनाही ५३५६ ९००२ ३४९४ हाच क्रमांक देण्यात आल्याने शासकीय कार्यालयातील गोंधळ समोर आला आहे.याप्रकरणाचा तपास अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तपास केला असता नागपूर जिल्ह्यातील नर्मदा चुटे यांच्या नावे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे गेल्याचे समोर आले.त्यानंतर सदर महिलेचा पुर्ण पत्ता काढून त्याच्या पतीला माहिती देत पत्र देण्यात आल्याची माहितीही गटविकास अधिकारी जमईवार यांनी दिली.
No comments:
Post a Comment