Thursday, 14 March 2019

दीड हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला

गोंदिया,दि.13 : गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या एकोडी येथील एका दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गंगाझरी पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो पोलीस स्टेशन गंगाझरी येथे कार्यरत आहे.
तक्रारदार हे शेतीसह दारु विक्रीचा व्यवसाय करायचे. त्याकरिता ते बिट अंमलदारांना १५०० रुपये मासिक हप्ता देत होते. दरम्यानच्या काळात दारु विक्रीचा व्यवसाय मंदावल्यामुळे ते बिट अंमलदारांना १५०० रुपये ऐवजी १००० रुपये मासिक हप्ता देत होते. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध आबकारी विभागाकडून अवैधरित्या दारु विक्रीची कारवाई झाल्यापासून त्यांनी दारु विक्रीचा व्यवसाय बंद केला होता. मात्र यानंतरही बिट अंमलदार देवेंद्र चोपकर यांनी तक्रारदारावर अवैध दारु विक्रीची कारवाई न करण्यासाठी १५०० रुपये मासिक हप्ताची मागणी केली.तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १२ फेब्रुवारीला देवेंद्र चोपकर विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली. १२ फेब्रुवारीला लाच मागणीची पडताळणी करून कारवाई केली.
आरोपी लोकसेवक देवेंद्र शिवलाल चोपकर (३२) याला १५०० मासिक हप्ताची लाच घेतांना रंगेहात पकडले. त्याच्या विरूध्द गंगाझरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला नायक पोलिस शिपाई वंदना बिसेन, गीता खोब्रागडे व चालक देवानंद मारबते यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...