Saturday, 30 March 2019

देवरीतिल दोन टॉवरवर जप्तीची कारवाई


देवरी,दि.30 : नगरपंचायतकडून मागील थकबाकी व चालू वर्षाचे सर्व प्रकारचे करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेतंर्गत देवरी येथील रिलायन्स कम्युनिकेशन प्रा. लि. व रिलायन्स जियो इन्फोकॉम प्रा. लि. सेंटर या दोन्ही टावर्सवर धंदा कर वसुलीकरिता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
येथील नगर पंचायत प्रशासनाकडून शहरातील व्यवसायिक, व्यापारी, नागरिक, शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय, मोबाईल टॉवर धारकांकडून मालमत्ता कर, व्यवसाय कर, पाणी कर आदी वसूल करण्यात येत असून यासाठी नगर पंचायतीकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार रिलायन्स कम्युनिकेशन प्रा. लि. कडे मागील सन २0१७-१८ या वित्तीय वर्षाचे ४0 हजार ३१0 तर यंदाच्या आर्थिक वर्षाचे ३६ हजार असे एकूण ७६ हजार ३१0 रुपयाचे थकीत व चालू वर्षाचे कर तर रिलायन्स जियो इन्फोकॉम प्रा. लि. सेंटर यांच्याकडे ३६ हजार रुपये व्यवसाय कर न भरल्याने या दोन्ही कंपनींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी विरेंद्र आचले, पाणी पुरवठा अभियंता सचिन मेश्राम, सहाय्यक लिपीक वामन फुन्ने व रोजगार सेवक यावलकर यांनी केली. नगर पंचायत प्रशसानाकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईने करचुकव्यांचे धाबे दणाणले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...