Friday 1 March 2019

अंगणवाडी कर्मचारी एकरकमी लाभापासुन वंचित

देवरी/चिचगड- 01
*माहिती अधिकारात अधिकारीच देताता  उडवाउडवीचे उत्तर*
*गोंदिया जिल्ह्यातील एकरकमी लाभाचे प्रस्ताव गहाळ*
*महादेव  श्यामकुवर यांचा उपोषणाचा ईशारा*
        शासनातर्फे सामान्य माणसाच्या हिताकरीता कितीही योजना राबविल्या  तरी त्यांची  प्रशासकीय यंत्रनेकडुन   अंमलबजावणी होत नसल्याने वारंवार  दिसुन येते.
    अंगणवाडी  सेविका , मदतनिस  यांना  सेवानिवृत्तीनंतर  एकरकमी लाभ देण्याचा  शासन निर्णय दि.३०एप्रिल २०१४ला महीला व बाल विकास विभागाने काढला . यामुळे अंगनवाडी  कर्मचारी सुखावलेले होते , परंतु  हाही शासन निर्णय कर्मचा-याकरिता लालीपॉप  दाखविणारा ठरला .
    सविस्तर असे की, अंकालु कैकाडु  शहारे यानीं दि. ०५-०५-२०१८ अंगणवाडी   सेविका मदतनिस  यांना
सेवानिवृत्तीनंतर   एकरकमी लाभ मंजुर  करण्याकरिता यासाठी उपमुख्यकार्यकारी  अधिकारी (बा.क.)गोंदिया यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची सद्या स्थितीची माहीती घेन्याकरीता अर्ज उपमुख्य कार्यकारी  अधिकारी(वा.क.) गोंदिया यानां केला होता . यावर त्यांनी विहीत कालावधीत माहीती न देता प्रथम अपीलीत सदर  प्रस्ताव दि.१९-०३-०१८ ला मा.विभागीय व्यवस्थापक, भारतीय जिवन  विमा  निगम पुणे येथे पाठविल्याचे समजते  , सदर प्रकरनाची  सहनिशा करण्याकरीता महादेव बालाजी  शामकुवर यांनी माहितीच्या अधिकारात एल.आय.सी.कार्यालय पुणे येथुन माहिती मागीतली  असता प्रस्तावासंबंधी मागीतलेली  माहिती आमच्या कार्यालयात उपलब्ध नाही असे दि.२९-०८-२०१८ च्या पत्रान्वे  कळविणयात आले .
यावर सदर माहीती कुठे गहाळ झाली याची माहीती मिळवण्याच्या दृष्टीकोणातुन पुन्हा १७-१२-२०१८ला शामकुवर यांनी महिला व बालविकास विभाग मंत्रालय  मुबंई येथे माहितीचा  अधिकार लावला . त्यावर कुठलीही माहिती मिळाली नाही
यावर संबधीत  माहीती कोणत्या विभागाकडे आहे ,त्या प्रस्तावाचे  काय झाले ,अंगणवाडी  कर्मचा-याना एकरकमी योजनेचा  लाभ केव्हा मिळनार ? या सर्व प्रश्नावर महादेव शामकुवर हे शासनाविरुध्द एल्गार करण्याच्या  तयारीत  असुन एकरकमी योजनेचा लाभ त्वरीत  द्यावा,अन्यथा उपोषणाचा इशारा महादेव शामकुवर यांनी प्रशासनाला दिला आहे .........................................................
 यावर माहिती अधिकार कार्यकर्ते भुपेन्द्र मस्के यांच्याशी  संपर्क साधले असता माहिती गहाळ होणे हा प्रचंड गंभीर गुन्हा  आहे , सार्वजणिक  अभिलेख अधिनियम २००५ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात यावे  असे त्यांनी सुचित  केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...