गोंदिया,दि.20 - येत्या 11 एप्रिल रोजी पार पडणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रित निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा यंत्रणेद्वारे जाणीव जागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मतदार संघातील शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी 25 व 26 तारखेला निबंध आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने जाणीव जागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत या मतदारसंघातील महाविद्यालय आणि शाळांमध्ये येत्या 25 मार्च रोजी विद्यार्थ्यांची वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. यानंतर 26 मार्च रोजी शाळेतून प्रथण येणाऱ्या स्पर्धकांची तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. 27 मार्च रोजी तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे विषय "लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांचे मतदान आवश्यक", "आम्ही जागरूक मतदार" आणि "नैतिक मतदान राष्ट्राकरीता आवश्यक आहे" ठेवण्यात आले आहेत. निंबध स्पर्धेसाठी शब्द मर्यादा 1 हजार 500 शब्दांची असून वेळ 2 तास राहील तर वक्तृत्व स्पर्धेकरीत 5 ते 7 मिनिटे वेळ दिला जाणार आहे. दोन्ही स्पर्धा या हिंदी किंवा मराठी भाषेतून राहतील, असे आयोजकांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी विस्तार अधिकारी एम. एस मोटघरे यांचेशी 9404306225 या क्रमांकावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment