भंडारा,दि. 19 :- लोकसभा निवडणूकीदरम्यान वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या पेड न्युज, इलेक्ट्रानिक्स मिडिया व सोशल मिडियावर प्रसिध्द होणाऱ्या जाहिराती व बातम्यांचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून सुक्ष्म सनियंत्रण करुन पेड न्युज आढळल्यास संबंधिताच्या निवडणूक खर्च खात्यात सदरहू खर्च समाविष्ठ करावा, अशा सूचना निवडणूक खर्च निरिक्षक नाकिडी सृजनकुमार यांनी दिल्या.
जिल्हा माहिती कार्यालय येथे लोकसभा निवडणूकीसाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मिडिया सेंटरचे उदघाटन सृजन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. नोडल अधिकारी निवडणूक खर्च तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, निवडणूक खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी श्रीकांत सुपे यावेळी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरिक्षक सृजन कुमार हे राजस्व सेवेचे अधिकारी असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने त्यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आज त्यांनी मिडिया सेंटरला भेट देवून उदघाटन केले. मिडिया सेंटरच्या माध्यमातून निवडणूक काळात माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्युजवर सनियंत्रण काम केले जाते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी निवडणूक खर्च निरिक्षकांना दिली.
यावेळी बोलतांना सृजन कुमार म्हणाले की, माध्यमात प्रसारित होणाऱ्या उमेदवारांच्या व पक्षांच्या संबंधी बातम्या नियमितपणे सनियंत्रित केल्या जाव्यात. समितीला पेड न्युज आढळल्यास तो खर्च पेड न्युज देणाऱ्या उमेदवाराच्या अथवा पक्षाच्या निवडणूक खर्च खात्यात त्याच दिवशी समाविष्ठ करण्यासाठी निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावा.
यावेळी सृजन कुमार यांनी समितीच्या मार्फत पाठविण्यात येणाऱ्या विविध अहवालांची पाहणी केली व समितीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समितीने या पुढेही नियमित अहवाल सादर करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. निवडणूक खर्च निरिक्षक नाकिडी सृजन कुमार यांचा मोबाई क्रमांक9960303156 हा असून निवडणूक काळात निवडणूक खर्चासंबंधी सृजन कुमार यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment